जादा व्याजासाठी दमदाटी करणाऱ्या ७ सावकारांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – व्याजाने पैसे देऊन त्याबदल्यात जादा व्याजाची आकारणी करणाऱ्या ७ सावकरांना अटक करण्यात आली आहे. मिरज तालुक्यातील तुंग येथील संजय टकुगडे यांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून अधीकच्या व्याजाची वसुली केली होती. या प्रकरणातील आणखी तीन संशयीत फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संभाजी नामदेव पाटील (वय 46, रा. कवठेपिरान, सध्या टी-मार्टमागे, शंभरफुटी रस्ता, सांगली), बाळू रघुनाथ भानुसे (43), विजय महादेव मदने (32), तानाजी पांडूरंग सुतार (सर्व रा. तुंग), दत्तात्रय यशवंत चव्हाण (55), प्रमोद उर्फ राहूल शंकर डांगे (39) व सुजीत शिवाजी कुंभार (30, कसबे डिग्रज, ता. मिरज) अशी अटक केलेल्या सावकारांची नावे आहेत. विकास भोसले, सागर वडगावे (कवठेपिरान), सुरेश किसन सुतार (रा. कसबेडिग्रज) हे तिघे पसार झाले आहेत.

टकुगडे यांच्या आईवर औषधोपचार करण्यासाठी यांनी दहाही संशयितांकडून एक लाखापासून ते सहा लाखांपर्यंतची रक्कम व्याजाने घेतली होती. या पैशांची त्यांनी व्याजासह परतफेड केली आहे. संशयित संभाजी पाटील याने वसुलीसाठी टकुगडे यांना घरात जाऊन शिवीगाळ व दमदाटी केली. संभाजी पाटीलने एक लाख रुपयाचे आतापर्यंत 2 लाख 40 हजार रूपये वसूल केले आहेत. विकास भोसलेने 1 लाख रुपयासाठी 1 लाख 60 हजार रूपये त्यांच्याकडून वसूल केले आहेत. टकुडगे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर गुरुवारी रात्री उशीरा यातील सातजणांना अटक करण्यात आली. तिघेजण पसार झाले आहेत.