गावठी पिस्तुलसह ७ जिवंत काडतुसे पकडले ; एलसीबीची कारवाई

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी शस्ञ बाळगु नये असे आदेश दिले आहे. दरम्यान तालुक्यातील नाने, सिताणे गावा जवळ एलसीबीचे पथक पेट्रोलींग करत असताना त्यांना संशयीत आढळून आला. त्याची चौकशी केली असता १ गावठी पिस्तुलसह ७ जिवंत काडतुसे त्याजवळ असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.

पो.नि. हेंमत पाटील यांना मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार पथकाला सुचित करुन संशयित रित्या फिरणारा संदिप राजपुत याला पथकाने पकडले यावेळी संदिपची अंग झडती घेताच पोलीसांना उडवा उडवीची उत्तरे त्याने दिली. दरम्यान पोलीसांनी खाक्या दाखवताच त्याने पिस्टल व काडतुस घरात लपविल्याचे सांगितले.

पथकाने नाने, सिताणे गावात संदिप आनंदसिंग राजपुत वय .26.रा.नाने, सिताणे याचे घरात छापा टाकुन १ पिस्टल, ७ जिंवत काडतुस जप्त केले. सदर जप्त केलेल्या पिस्तुलची किंमत 40,000 व काडतुसची किंमत 2,800 रुपये आहे. दरम्यान विना परवाना शस्ञ बाळगण्यावरुन गुन्ह्यांची नोंद करुन आरोपीला गजाआड केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.