महाराष्ट्र-छत्‍तीसगड सीमेवर 7 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’, AK-47, 303 रायफलींसह मोठा शस्त्रसाठा जप्‍त

नवी दिल्ली : वृत्‍तसंस्था  –महाराष्ट्राच्या गडचिरोली आणि छत्‍तीसगड सीमेवरील राजनांदगाव जिल्हयातील शेरपाल आणि सीटागोटा डोंगरावर झालेल्या नक्षलवादी आणि सुरक्षा यंत्रणेच्या जवानांमध्ये चकमक झाली. चकमकीत जिल्हा पोलिस, डीआरजी आणि सीआरपीएफच्या जवानांनी 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. दत्‍तीसगडच्या राजनांदगाव जिल्हयात ही घटना शनिवारी सकाळी घडली. बागनदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हा पोलिस, जिल्हा राखीव गार्ड (डीआरजी) आणि सीआरपीएफच्या जवानांनी राबविलेल्या संयुक्‍त मोहिमेत ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत छत्‍तीसगडचे पोलिस महासंचालक यांनी माहिती दिली असून त्यांनी 7 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याच्या वृत्‍ताला दुजोरा दिला आहे. सध्या ऑपरेशन सुरूच असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांकडून एके-47, 303 रायफलसह इतर अग्‍नीशस्त्रांचा मोठा साठा जप्‍त केला आहे. नक्षलवादी आणि सुरक्षा यंत्रणेमध्ये झालेल्या या चकमकीमुळे महाराष्ट्र आणि छत्‍तीसगड सीमेवर प्रचंड खळबळ उडाली आहे. छत्‍तीसगडचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, आणि डीआरजीचे अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. अजूनदेखील ऑपरेशन चालू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –