एकाच फ्रेममध्ये दिसल्या ‘प्रियंका-ऐश्वर्या’सह ‘या’ 7 मिस इंडिया विनर्स ! सोनम कपूरनं शेअर केला फोटो

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार लारा दत्तानं 2000 साली मिस युनिव्हर्ससाठी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तिनं हा किताब आपल्या नावावरही केला होता. आता या गोष्टीला 12 मे रोजी 20 वर्षे झाली आहेत. लारानं त्यावेळचे काही खास फोटो सोशल मीडियावरून शेअर केले होते. एका फोटोत तिच्या डोक्यावर क्राऊनही दिसत आहे. तिचे फोटो क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

या फोटोची खास बात अशी होती की, यात भारतासाठी ब्युटी क्वीनचा किताब जिंकणाऱ्या सर्व महिला सोबत दिसत होत्या. फोटोत सुष्मिात सेन आहे. जिनं 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. यानंतर 1994 ची मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय, मिस वर्ल्ड 1997 डायना हेडन, मिस वर्ल्ड 1999 युक्ता मुखी, मिस युनिव्हर्स 2000 लारा दत्ता अशा इतर सुंदरी दिसत आहेत.

हाच फोटो अभिनेत्री सोनम कपूरनं तिच्या इंस्टारून शेअर केला. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, “या सगळ्यांमध्ये किती बदल झाला आहे ना.” हा फोटो अनेकांना खूप आवडला आहे. लोकांचं म्हणणं आहे की, याआधी त्यांनी हा फोटो कधीच पाहिला नव्हता.