‘कोरोना’ग्रस्त बाळाबरोबर नर्सचा ‘हा’ Video व्हायरल, नि:शब्द करणारा क्षण पाहाच (व्हिडीओ)

 पोलीसनामा ऑनलाइन –  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दरदिवशी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच खबरदारीचा उपाय म्हणून 21 दिवसांचा लॉकडाउन करण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी असतील किंवा वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स, सफाई कामगार हे सर्वच आपल्या सेवेसाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता झटताना दिसत आहे. हे सर्वजण आपल्यासाठी देवदुतासारखे धावून येत आहेत. नुकताच एका सात महिन्यांच्या करोनाग्रस्त बाळाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

निशब्द करणारा क्षण! कोरोनाग्रस्त मुलाला खेळवताना एक नर्स.

मुंबईमध्ये ०७ महीन्याच्या कोरोना पॉझिटिव्ह मुलाला हसवताना एक परिचारिका (नर्स), सलाम आहे कोरोनाच्या संकटात स्वतःला झोकून देऊन लोकांची सेवा करणाऱ्या या सर्वांना.

Geplaatst door मनसे वृत्तांत अधिकृत op Vrijdag 3 april 2020

यासंदर्भात मनसेने एका सात महिन्यांच्या बाळाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या बाळाला करोनाची लागण झाल्याचे म्हटले आहे. या बाळावर रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची योग्य ती काळजीही घेतली जात आहे. दरम्यान, या बाळासोबत खेळणार्‍या एका परिचारिकेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्या परिचारिका त्या बाळासोबत खेळताना दिसत आहेत. त्याला गाणीही म्हणून दाखवत आहेत. त्यांच्यासोबत ते बाळही खुप चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. अशा प्रकारे सर्वांची काळजी घेणार्‍यांना देवदुतच म्हणावे लागणार आहे.

You might also like