ट्रक-बोलोरो मध्ये झालेल्या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार, चौघे जखमी

नेकनूर (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन – बीड जिल्हयातील नेकनूर येथे आज (सोमवारी) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. भरधाव बोलेरो आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला आहे. ही घटना मांजरसुंबा-पाटोदा रोडवर नेकनूर येथे घडली आहे.

भरधाव बोलेरो उभ्या असलेल्या ट्रकच्या पाठीमागुन जोरात धडकल्याने हा अपघात झाला आहे. बोलेरोमधील 7 जण जागीच ठार झाले आहेत. बीड तालुक्यातील निवडुंगवाडी येथील काही ऊसतोड मजुर बोलेरोमधून जात असल्याची माहिती समोर आली आहे.


अतिशय भयानक असा हा अपघात आहे. अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

अपघातात चार जण जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भरधाव बोलेरो अतिशय वेगात असल्यानं हा अपघात झाला आहे. बोलेरोमधील 7 जण जागीच ठार झाले आहेत.

सविस्तर वृत्त थोडयाच वेळात

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like