‘फिक्स डिपॉजिट’ करताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भारतात ‘फिक्स्ड डिपॉजिट’ करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कारण एफडी गुंतवणूक करणे इतर मानाने सुरक्षित पर्याय मानला जातो. असे असेल तरी गुंतवणूक करताना काही गोष्टींची लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ज्याचा तुम्हालाच गुंतवणूक करताना फायदा होऊ शकतो. कारण काही बाबींकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते. जसे की एफडी मध्ये मॅच्युरिटी झाल्यावर एक दिवस देखील उशीर झाल्यास तुम्हाला व्याजाचा फायदा किंवा नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे हे योग्य ठरेल की तुम्ही एफडी करताना सर्वात आधी त्याची संपूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

एक दिवस देखील असतो महत्वाचा –

अनेक लोक एफडी करताना ६ महिने, १ वर्ष, २ वर्ष अशा प्रकारे वैधता ठेवतात. काही बँकांमध्ये या काळात १ जास्त दिवस किंवा कमी झाला तर एफडीवर मिळणारे व्याज दर वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे एफडी सुरु करताना त्याची मॅच्युरिटी आणि व्याज यांची महिती घेणे आवश्यक असते. म्हणजे ठरलेल्या अवधीच्या १ दिवस आधी किंवा नंतर कदाचित तुम्हाला जास्त व्याज मिळू शकते.

अवधि पुर्ण होई पर्यंत मिळेल तेच व्याज –

जरी आरबीआयकडून व्याज दरात बदल होत असतील तरी तुम्हाला एफडीचा कालावधी पुर्ण होई पर्यंत तेच व्याज मिळेल जे एफडी सुरु करताना होते. त्यामुळे एफडी धारकाला व्याज दर ठरलेला असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा फायदा किंवा नुकसान होणार नाही. परंतू मॅच्युरिटी वेळी पैसे काढेल तर तुम्हाला नुकसान होणार नाही मात्र उशीर केला तर तुम्हाला नुकसानाला सामोरे जावे लागेल.

लहान मुलांच्या आरोग्यासाठी ‘घोळ मासा’ फायदेशीर

सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ?

ब्रश केल्यानंतरही तोंडाची दुर्गंधी येते का ? ही असू शकतात कारणे

वंचितला भाजपची ‘बी’ टीम म्हणणाऱे अशोक चव्हाण नरमले, ती टीका ‘राजकिय’

तब्बल १८ महिन्यापासून पगाराविना,अण्णाभाऊ साठे स्मारक समिती कर्मचाऱ्यांची हेळसांड

 

Loading...
You might also like