7 वर्षाच्या मुलानं सॅन्टा क्लॉजला लिहीलं पत्र, ‘चांगल्या बाबां’ची केली मागणी, लेटर वाचून व्हाय ‘भावूक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नाताळला लवकरच सुरुवात होणार आहे, त्यामुळे आता लहान मुलांना सेंटा क्लॉजच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. एका सात वर्षाच्या मुलाने सेंटा क्लॉजला लिहिलेले एक पत्र सध्या चांगलेच चर्चेचा विषय बनत चालले आहे. सोशल मीडियावर या पत्राची चांगलीच चर्चा आहे. ‘सेफ हेवन ऑफ टैरेंट काउंटी’ नावाच्या एनजीओने हे पत्र फेसबुकवर टाकले आहे.

ब्लेक नावाच्या सात वर्षीय मुलाने ‘चांगले पिता’ हवेत अशा प्रकारचे पत्र लिहिले आहे जे की सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ब्लेक त्याच्या आईबरोबर एका शेल्टर होममध्ये टेक्सासमध्ये राहतो.

काय लिहिलंय ब्लेकने आपल्या पत्रात
‘प्रिय सांता, आम्हाला आमचे घर सोडावे लागले. वडील खूप रागावले. वडिलांना हवे असलेले सर्व मिळाले. आई म्हणाली की आता आम्हाला घर सोडावे लागेल. ती आम्हाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जात आहे. अशी जागा जिथे आपल्याला भीती वाटण्याची गरज नाही. मी अजूनही अस्वस्थ आहे. मला इतर मुलांबरोबर बोलण्याची इच्छा नाही. आपण या ख्रिसमसला येणार आहेत का ? ‘ असा सवाल देखील ब्लेकने या पत्रातून विचारला आहे.

आमच्याकडे या ठिकाणी कोणतेच सामान नाही, तुम्ही माझ्यासाठी येताना काही पुस्तके, एक डिक्‍शनरी, एक कंपास आणि एक घड्याळ घेऊन येऊ शकता का ? मला एका चांगल्या वडिलांची देखील खूप गरज आहे. काय तुम्ही माझ्यासाठी एवढे करू शकता का ? अशा प्रकारची मागणी देखील यावेळी ब्लेकने पत्रातून केली आहे.

एनजीओच्या उपाध्यक्ष एमिली हैनकॉक सांगतात की, शेल्टर होममध्ये राहणाऱ्या मुलाचे आर्ट वर्क बगताना त्यांना हे पत्र सापडले ज्यात मुलाने अनेक साऱ्या मागण्या केलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अनेकांसोबत हे पत्र शेअर केल्याचे सांगितले. माइका थॉम्पसन यांनी सांगितले की, आम्ही ब्लेकच्या अनेक इच्छा पूर्ण करणार आहोत जेणेकरून तो आनंदी होईल.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/