माजी आमदाराच्या घरावर दरोडा टाकणारा ७ वर्षांनी गजाआड

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन

डोंबिवलीतील माजी आमदाराच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या सराईत दरोडेखोराला सात वर्षांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या दरोडेखोराला डोंबिवली पोलिसांनी उस्मानाबाद येथून अटक केली.

[amazon_link asins=’0141012692′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff23700c-8f2e-11e8-b5a6-7dd248eac7ab’]

माजी आमदार हरिश्चंद्र पाटील यांच्या डोबिवली येथील घरावर पाचजणांनी २०११ मध्ये सशस्त्र दरोडा टाकला होता. पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये चार जणांना अटक केली होती. तर सराईत गुन्हेगार अनिल पवार हा फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार करुन त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.अनिल पवार याच्या विरोधात डोंबिवली, विष्णू नगर पोलीस स्थानकात गुन्हे दखल आहेत.

अनिल पवार उस्मानाबाद येथे कळंब येथील शिंदे वस्तीत राहत असल्याची खबर पोलीसाना मिळाली या माहितीच्या आधारे वाय. टी. तायडे, एस. के. भुजबळ, आर. एस. बनसोडे हे पोलीस थेट उस्मानाबाद गाठत अनिलला बेड्या ठोकल्या आहेत .