अमेरिकेच्या बोस्टनमध्ये नॅचरल गॅसच्या पाइपलाइनमध्ये  70 विस्फोट

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

अमेरिकेतील बोस्टनमध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. आतापर्यंत जवळपास 70 वेळा स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून शेकडो लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस पाईपलाईन अपग्रेड करण्याचे काम सुरू असताना हे स्फोट झाले. या स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने उपचारासाठी लॉरेंस जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या परिसरातील वीज काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

[amazon_link asins=’B015SUPDVW,B010FOU1D6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’62bca099-b7db-11e8-9c10-0363ae53d46a’]

अधिकाऱ्यांनी सांगितले  की, घरांमध्येही गॅस आहे, यामुळे लोकांनी घराबाहेर राहावे. पाइपलाइनमध्ये जास्त दाब झाल्याने विस्फोट झालेले असू शकतात. एंडोवर फायर डिपार्टमेंटचे चीफ मायकल मेंसफील्ड म्हणाले की, ही एक मोठी घटना होती. अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आम्ही एका घरात आग विझवित असताना दुसऱ्या घरात आग लागत होती. सर्व सुरळीत होण्यासाठी एका आठवड्यापेक्षाही जास्त काळ लागेल.

न्यू हैंपशायरचे अग्निशमन अधिकारी जॉन मॅकआर्डल म्हणाले, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ५० अग्निशमन विभागांना लावण्यात आले आहे. नॉर्थ एंडोवरच्या एका महिलेने सांगितले की, तिच्या घराजवळ ३ इमारतींमध्ये आग लागली होती. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन जवानांनी पूर्ण परिसराला घेरले. पाइपलाइन कोलंबिया गॅस कंपनीची आहे. अधिकारी म्हणाले की, पूर्ण राज्यात पाइपलाइनला अपग्रेड केले जाईल. कोलंबिया गॅसचे प्रवक्ते केन स्टेमेन म्हणाले की,  पाइपलाइनमध्ये विस्फोट कसे झाले, याची आम्ही चौकशी करत आहोत.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.