पुणे-सोलापूर रस्त्यावर ७० किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यामध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या चौघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक करुन दहा लाखांचा ७० किलो गांजा जप्त केला आहे. तपासा दरम्यान हा गांजा ओडिशा राज्यातून आणला असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई पुणे-सोलापूर रोडवर द्राक्ष संशोधन केंद्राजवळ नुकतीच करण्यात आली.

विष्णू किसन जाधव (वय ३४, रा. माळशिरस), अखिल बिपीन नायक (२२) सुब्रत सीताकांत नायक (२०), पिटर देवराज नायक (२७, तिघे रा. ओडिशा) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

[amazon_link asins=’B079HW1MWC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7b4d25d2-7d02-11e8-a665-4b55885bb6c4′]

पुणे-सोलापूर रोडवर द्राक्ष संशोधन केंद्राजवळ एका गाडीमध्ये मोठ्याप्रमाणात गांजा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या पथकाने तेथे जाऊन एका गाडीची तपासणी केली. त्यामधील चार बॅगा आणि एका पिशवीमध्ये ७०.३८१ किलो गांजा असल्याचे आढळून आले. जप्त केलेल्या गांजाची किंमत १० लाख ५५ हजार इतकी आहे. या तिघांनी विष्णू जाधव याच्या सांगण्यावरून ओडिशा येथून गांजा आणल्याचे समोर आले आहे. विष्णू जाधव यांच्यावर यापूर्वी २०१५ मध्ये गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.