आश्चर्य ! देशातील 70 % ‘प्लंबर’ येतात ‘या’ जिल्ह्यातून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओडिसातील एक जिल्हा एका खास कारणासाठी प्रसिद्ध असून या ठिकाणाची विशेष ओळख समजल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. येथील एक जिल्हा खास प्लंबरचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशातील 70 टक्के प्लंबर याच शहरातून येतात.

केंद्रपाडा जिल्हा हा या लोकांसाठी ओळखला जात असून या ठिकाणी पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात येत असतात. ऑलिव्ह रिडले कासव पाहण्यासाठी पर्यटक याठिकाणी येत असून या ठिकाणी राहणारे प्लंबर देखील या ठिकाणची शान आहेत. त्याचबरोबर वर्षाला त्यांना या व्यवसायाच्या माध्यमातून 30 लाख रुपये देखील कमवून देतात. या जिह्यातील प्रत्येक घरात एकतरी प्लंबर आहेच. म्हणूनच या जिल्ह्याला प्लंबरचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. 1930 पासून येथील लोकांचा हा व्यवसाय असून त्याकाळी कोलकात्यात असणाऱ्या ब्रिटिश कंपनीमध्ये येथील तरुणांना प्लंबर म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर फाळणीनंतर सर्वात जास्त प्लंबर हे पाकिस्तानमध्ये स्थायिक झाल्याने या जिल्ह्यातील प्लंबरला याचा फायदा झाला आणि हा जिल्हा प्लंबरचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला.

दरम्यान, मागील अनेक पिढ्या हेच काम करत असून येथील अनेक नागरिक विदेशात देखील प्लंबरचे काम करतात. आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात येथील नागरिक काम करत असून या व्यवसायामधून ते महिन्याला 50 हजार रुपये ते अडीच लाख रुपयांची कामे करत आहेत. आणि सर्वात महत्वाचे आणि विशेष म्हणजे फक्त 50 हजार लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात विविध बँकेच्या 14 शाखा आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –