काय सांगता ! होय, ‘या’ 70 वर्षीय म्हातार्‍यानं चक्‍क व्यक्‍त केली पी.व्ही. सिंधूशी लग्‍न करण्याची इच्छा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – एका 70 वर्षांच्या आजोबांना या वयात लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, यात विशेष काय तर या आजोबांनी चक्क बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू बरोबर लग्न करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. हे आजोबा तमिळनाडूच्या रामनाथपूरम जिल्ह्यातील असून त्यांचे नाव मलाईस्वामी असे आहे. ते फक्त इच्छा व्यक्त केली नाही तर त्यासाठीची याचिका त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे सोपवली.

मलाईस्वामी यांनी धमकी दिली आहे की लग्नाची योग्य तयारी करण्यात आली नाही तर पी व्ही सिंधूचे अपहरण करु आणि लग्न करु. लोक जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडत आहेत. याच दरम्यान मलाईस्वामी यांनी देखील याचिका दाखल केली.

या आजोबांनी आपला जन्म 4 एप्रिल 2004 साली झाला असे सांगितले असून त्याचे वय फक्त 16 वर्षाचा आहे असा दावा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या याचिकेत केला आहे. सिंधूने ज्या प्रकारे आपल्या करियरची उंची गाठली त्याने मी प्रभावित झालो असे देखील यात म्हणले आहे. या आजोबांनी पी व्ही सिंधूचा एक फोटो एका बंद पाकिटात त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे दिला आहे आणि त्या ही माहिती दिली होती.

You might also like