संतापजनक ! नशेत ‘माज’लेल्या 2 नराधमांकडून 70 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

श्रीगंगानगर (राजस्थान) : वृत्तसंस्था – राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सादुलशहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नशेत झिंगाट असणाऱ्या दोन तरुणांनी एका 70 वर्षीय आजीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधमांनी बलात्कार करण्यापूर्वी वयोवृद्ध महिलेला बेदम मारहाण केली होती. या महिलेवर सादुलशहर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दोन नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घटली त्यावेळी 70 वर्षीय आजी घरामध्ये एकट्या होत्या. तिचा मुलगा उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या कामामुळे बाहेर गेला होता. पीडित महिला घरामध्ये एकटी असल्याचे पाहून दारूच्या नशेत असलेले दोन तरुण घरामध्ये घुसले. त्यांनी महिलेला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर दोघांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. प्रचाराचे काम उरकल्यानंतर मुलगा घरी आल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.

पीडित महिलेला तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्रथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तिला सादुलशहर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. या घटनेची सादुलशहर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी महिलेच्या मुलाने पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दलेर सिंह आणि मीमा सिंह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like