‘मोडी’चं वारं ! WhatsApp च्या माध्यमातून ७०० वर्षापुर्वीची मराठी लिपी ‘पुर्नजिवीत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मिडियाचा लोक विविध प्रकारे वापर करतात, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मात्र भारतात जोमाने होतो. त्यात जास्त प्रमाण असते ते फेक न्युजचे. परंतू याच व्हॉट्सअ‍ॅप मुळे मराठी माणसाला आभिमान वाटावा असे घडत आहे. कारण व्हॉट्सपच्या वापरातून सध्या मराठीची मोडी लिपी पुन्हा जिवंत होत आहे. जी अनेक वर्षापासून अलिप्त झाली आहे.

याच मराठीची बहीण मानल्या जाणाऱ्या मोडी लिपीची शिक्षण सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यामातून अनेक लोक घेत आहेत. ऐवढेच नाही तर अनेक लोकांनी ही लिपी शिकण्यासाठी उत्साह दाखवल्याचे समोर येत आहे. या लिपीबद्दल लोकांच्या मनात उस्तुकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना त्या भाषेचे ज्ञान देण्यासाठी सध्या व्हॉट्स अ‍ॅपवर काही ग्रुप सक्रिय झाले आहेत.

पेशवे काळात होत होता वापर –
मोडी लिपी ही ७०० वर्ष पुर्वीची आहे. ज्याचा पेशव्याच्या काळात लेखणासाठी वापर केला जात असे. मुंबईतील डोंबिवलीमधील अक्षय प्रभुदेसाई हे मोडी लिपी शिकवणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा भाग आहेत. ते म्हणतात की मोडी लिपी शिकणं हा माझा छंद आहे. त्यामुळे बऱ्याच प्रयत्न नंतर मला हा मोडी लिपी शिकवणारा ग्रुप मिळाला आहे. त्यासाठी प्रभुदेसाई ७९९ रुपये शुल्क देखील देत आहेत. या ग्रुपवरुन शिक्षक मोडी लिपीची अक्षर त्यांना देण्यात येतात. त्यानंतर त्या अक्षरे शिकून त्याचे फोटो शिक्षकांना व्हॉट्सअ‍ॅप वर पाठवायचे.

या ग्रुप्सच्या माध्यमातून २००० लोकांना मोडी लिपी शिकवली जाते. हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप नाशिक मधील सोजवाल साली या चालवतात.सोजवाल सोली यांच्याकडून आता पर्यंत २००० लोकांना मोडी लिपी शिकवण्यात आली आहे.

सोली यांना अनेकदा अनुभव आला की लोकांना या लिपी बद्दल माहिती नाही, त्यांनी सांगितले की, मोडी स्क्रिप्टला १२ व्या शतकात १२६० इसवी सन पूर्व मध्ये यादव साम्राज्याचे पंतप्रधान हेमाद्रि पंडित यांनी ही पुढे आणली होती.

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

Loading...
You might also like