दहावी मध्ये पहिल्या आलेल्या मुलांच्या हस्ते केले ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी केली प्रात्यक्षिके

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन (अरुण ठाकरे) – भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हेरिटेज इंग्लिश मिडीयम स्कुल मुरबाड येथे ध्वजारोहनाचा सोहळा पार पडला. या प्रसंगी शाळेचे चेअरमन मुकेश विषे यांनी झेंडावंदन केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे संचलन करून विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर करून मने जिंकली

murbad

याप्रसंगी मुरबाड नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा अर्चना विषे, महिला व बालकल्याण सभापती साक्षी चौधरी, प्रिन्सिपल नुपूरडे, इंचार्ज पुनम पवार, ऍड रत्नाकर आलम, विद्यार्थी, पालक, शिक्षकवर्ग आणि मान्यवर उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले या मध्ये लहान लहान चिमुकल्यांनी भाग घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी, पोलीस, सोल्जर अशी विविध वेशभूषा करून आपली कला सादर केली. हेरिटेजमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर विविध प्रात्यक्षिके सादर करत लक्ष वेधून घेतले

murbad
मुरबाड येथील न्यू इंग्लिश स्कूल मुरबाड येथे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर सह्याद्री प्रतिष्ठान मुरबाड यांनी सिद्धगडावर स्वच्छता मोहीम राबवून ध्वजारोहण करून आनंद साजरा केला. मुरबाडमध्ये भादाने गावाचे माजी सरपंच संजय हंडोरे यांनी दहावी मध्ये पहिल्या आलेल्या मुलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा पायंडा पडला असून झेंडावंदन व ध्वजारोहणाचे दहावे मानकरी कु.कल्पना गौतम धनगर व त्यांचे वडील गौतम वामन धनगर यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा, भादाणे येथे झेंडावंदन करण्यात आले. या पाठोपाठ मुरबाडमधील अनेक ग्रामपंचायतीने निर्णय घेऊन दहावी मध्ये पहिल्या आलेला विद्यार्थी आणि पालक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाचा मान विद्यार्थी आणि पालक वर्गाला मिळत असल्याने पालक, विद्यार्थी, गावकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत असल्याचे माजी सरपंच संजय हंडोरे यांनी पोलीसनामा रिपोर्टर अरुण ठाकरे यांच्याशी बोलतांना सांगितले

फेसबुक पेज लाईक करा –