72 Hoorain Teaser Release | लव जिहादचे रहस्य उलघडून सांगणारा आणखी एक चित्रपट ‘72 हुरैन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 72 Hoorain Teaser Release | सध्या देशात दहशतवाद आणि लव जिहाद (Love Jihad) अशा विषयांवर प्रकाश टाकणारे अनेक चित्रपट येत आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Director Sudipto Sen) यांचा लव जिहादवर असणारा नुकताच प्रदर्शित झालेला ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपट देशभरात चांगलाच गाजला. या चित्रपटाने काहीच दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. काही जणांचा हा चित्रपट खोटा असल्याचा दावा होता तर काही लोकांनी हा चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतला. याआधी काश्मीर पंडितांची व्यथा मांडणारा ‘द काश्मीर फाईल्स्’ (The Kashmir Files) या चित्रपटावरूनही देशात गदारोळ माजला होता. (72 Hoorain Teaser Release)

सध्या ‘द केरळा स्टोरी’ नंतर सोशल मीडियावर आता ‘72 हुरैन’ (72 Hoorain) या चित्रपटाची चर्चा रंगत आहे. या चित्रपटाचा टीझर चित्रपटाचे निर्माते अशोक पंडित (Producer Ashok Pandit) यांनी आपल्या सोशल मीडिया अंकाऊंटवरून पोस्ट केला आहे. त्यानंतर या टीझरचे हजारो व्ह्युज आले असून अनेक नेटकरी यावर आता प्रतिक्रिया देताना दिसत आहे. ‘द केरला स्टोरी’मुळे आधीचं देशात लव जिहाद वरुन वातावरण गरम आहे. यामध्ये आता ‘72 हुरैन’ चित्रपटाची भर पडली आहे.

Advt.

‘72 हुरैन’ या चित्रपटाचा टीझर अत्यंत रोमांचकारी असून यामध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करणारा ओसामा बीन लादेन (Osama Bin Laden), ताज हॉटेलवर हल्ला करणारा अजमल कसाब (Ajmal Kasab), 1993 साली मुंबईवर हल्ला करणारा याकुब मेमोन (Yakub Memon), महसुद अजहर (Masood Azhar) यांसारख्या खुंकार दहशतवादी लोकांचा चेहरा दाखवण्यात आला आहे. यामध्ये पवन मल्होत्रा (Pawan Malhotra) आणि आमिर बशीर (Aamir Bashir) यांची प्रमुख भूमिका असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय पुरण सिंग चौहान (Sanjay Pooran Singh Chauhan) यांनी केले आहे. “72 हुरैनची मिथक उघड करत आहोत” अशा टायटलने याचा टीझर सर्वत्र गाजत आहे.

 

 

निर्माते अशोक पंडित यांनी टीझरला कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, आमच्या #72हुरैन चित्रपटाचा फर्स्ट लुक तुमच्यासमोर सादर करण्याचे वचन दिले आहे. मला खात्री आहे की तुम्हाला ते आवडेल. दहशतवादी गुरूंनी दिलेल्या आश्वासनप्रमाणे 72 कुमारिकांना भेटण्याऐवजी तुम्ही क्रूरपणे मरण पत्करले तर? माझ्या आगामी ‘72 हुरैन’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक सादर करत आहोत. हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी रिलीज होणार आहे.

यावर काही लोकांनी कौतुक केले आहे. तर काही लोकांनी हे द्वेष पसरवण्याचे माध्यम असून प्रोपागंडा पसरवण्याचे काम आहे असे बोलले आहे.
मुस्लिम लोकांना नकारात्मक दृष्ट्या दाखवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे.
तेव्हा प्रेक्षकांनी सजगपणे त्या गोष्टींचा विचार करावा.
दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे की, द्वेष हा काही फार वेळ चालणारा नाही हे सगळ्यांनी लक्षात घेण्याची गोष्ट आहे.

द केरळा स्टोरीवरुन झालेल्या गदारोळ आणि राजकारण यानंतर आता पुन्हा लव जिहाद वर आधारित चित्रपट
पुढील महिन्यात येत आहे. आता हा चित्रपट किती कोटींची कमाई करतो आणि या ’72 हुरैन’
(72 Hoorain Teaser Release) चित्रपटामुळे देशाचे राजकारण किती ढवळून निघते यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title :  Shirur Lok Sabha | former mla vilas lande statement that only amol kolhe has another chance from shirur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, टीका करताना शरद पवारांचा एकेरी उल्लेख (व्हिडिओ)

Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिसांकडून कात्रज चौकात रात्रीच्या वेळी परराज्यातील प्रवाशांना लुटणार्‍यांना अटक

Chandrakant Patil – Kothrud Pune | लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार – चंद्रकांत पाटील