‘अंबिका’ला 72 व्या वर्षी मिळाली वेदनेपासून कायमची ‘मुक्ती’, भारताकडून अमेरिकेला दिली होती ‘भेट’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – १९६१ मध्ये भारतीय मुलांकडून अमेरिकेला भेट म्हणून दिलेली ७२ वर्षीय मादी हत्ती ‘अंबिका’ने या जगाला अखेर निरोप दिला आहे. हत्तींच्या कळपातील सर्वात मोठी सदस्य असलेल्या अंबिकाच्या मृत्यूवर सोनियन नॅशनल प्राणिसंग्रहालयात शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, अंबिका हाडांच्या आजाराने त्रस्त होती. तिची ठीक होण्याची कोणतीच आशा नसल्याने राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात पशुवैद्यांनी तिला या वेदनांपासून आराम दिला.

शनिवारी स्मिथसोनियन नॅशनल प्राणिसंग्रहालयात उत्तर अमेरिकेतील तिसर्‍या क्रमांकाचा आशियाई मादी हत्ती अंबिकाचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्मिथसोनियन नॅशनल प्राणिसंग्रहालय आणि कॉन्झर्वेशन बायोलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या स्टीव्हनसनफोर्ट यांनी सांगितले की, “अंबिका खरंच आमच्या संवर्धन समुदायामध्ये एक विशाल मादी हत्ती होती,” प्राणिसंग्रहालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या आशियायी हत्तीच्या कळपातील सर्वात प्रिय वयस्कर सदस्य अंबिकाला शुक्रवारी मृत्यू दिला गेला. नुकतीच तिची प्रकृती खालावली होती आणि तिच्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. अंबिकाच्या निधनाबद्दल अमेरिकेचे भारताचे राजदूत तरनजितसिंह संधू यांनी ट्विट केले की, “अंबिकाच्या आत्म्यास देव शांती देवो, ही भारताकडून प्रिय भेट आहे.”

अंबिकाचा जन्म १९४८ च्या सुमारास भारतात झाला होता. ती केवळ आठ वर्षांची असतानाच तिला कुर्गच्या जंगलात पकडण्यात आले. १९६१ पर्यंत तिचा वापर माल वाहून नेण्यासाठी केला जात होता आणि त्यानंतर मुलांच्या वतीने अमेरिकेला भेट म्हणून देण्यात आले. प्राणिसंग्रहालयाच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार अंबिकावर हाडांच्या आजारावर उपचार सुरू होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like