पेन्शनच्या पैशातून तयार केलं ‘मास्क’ ! 72 वर्षीय आजोबांचं PM मोदींनी केलं ‘कौतुक’

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या लढ्यासाठी देशातील अनेक नागरिकांना मदतीचा हात दिला जात आहे. त्यामध्ये डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आपल्या जीवची पर्वा न करता कोरोनाचा सामना करत आहेत. अशातच एका आजोबांचा एक व्हिडीओ व्हारयल झाला आहे. 74 वर्षीय आजोबांनी पेन्शनच्या पैशातून मास्क तयार करून लोकांना दिले आहे.जम्मू काश्मीरमधील या आजोबांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील कौतुक केले आहे. योग राज मेंगी अस त्यांचे नाव आहे.

योग राज मेंगी यांनी मिळणार्‍या पेन्शनच्या रकमेतून 6 हजार मास्क तयार करून लोकांना वाटले आहेत. रकमेतून गरजूंना मोफत अन्नधान्याचे वाटपही करत आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्विटला रिट्विट करत अशा नागरिकांचा अभिमान असल्याचे नमूद केले आहे. कोरोना विरोधातील लढ्यात ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असेही मोदी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व नेटीझन्सकडून कौतुक होत आहे.