सलमान खान म्हणतो, ‘हे’ वय लग्नासाठी एकदम ‘सही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग सलमान खान कधी लग्न करणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सलमान नेमकं कधी लग्न करणार हे जरी माहीत नसलं तरी लग्नासाठी योग्य वय कोणतं आहे याचं मात्र उत्तर खुद्द् सलमान खानने दिलं आहे. सलमान खानच्या मते 72 वर्ष हे वय लग्नासाठी योग्य वय आहे. भारत सिनेमाच्या निमित्ताने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सलमान बोलत होता. तेव्हा सलमानने लग्नाच्या विषायावर भाष्य केलं.

बॉलिवूडचा दबंग स्टार भाईजान सलमान खान आता 53 वर्षांचा झाला आहे. सिने जगतातील त्याच्या फिल्मी करिअरला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याच्या वर्षांच्या काळात सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेल्याचं पाहायला मिळालं आहे. सलमान खानच्या लग्नाविषयी लाखो चाहत्यांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. ज्याअर्थी सलमान खानने भारत या सिनेमात 70 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली आहे. त्याअर्थी लग्नाचं वय 72 वर्ष आहे असे सलमानने म्हटले आहे.

लग्नसंस्थांबाबत बोलताना काही दिवसांपूर्वीच सलमान खान म्हणाला होता की, त्याचा लग्नसंस्थांवर विश्वास नाही. त्याने असे म्हटले होते की, “लग्नसंस्था हळूहळू लुप्त होत जाणार आहेत. परंतु सहचाऱ्यावर माझा विश्वास आहे.” असे सलमान म्हटला होता.

काही महिन्यातच सलामन होणार बाबा

काही दिवसांपूर्वी अशी चर्चा रंगताना दिसत होती की, सलमान खान बाबा होण्याची तयारी करत आहे. सलमान खान सरोगसीच्या मदतीने बाबा होणार आहे असे सर्वत्र बोलले जाताना दिसत होते. याचाही खुलासा झाला आहे. येत्या काही महिन्यात सरोगेट पद्धतीने बाबा होण्याचा सलमानचा मानस आहे. आपले वडिल सलीम आणि आई सलमा यांना नातवंडाचं तोंड पाहायचं आहे असे सलमान खान म्हणाला.

‘नच बलिए’ची करणार निर्मिती

एक खास कंसेप्ट घेऊन सलमान खान आता टीव्ही वरील डान्स रिअॅलिटी शो ‘नच बलिए’ची निर्मिती करणार आहे. सलमान खानने याबाबत माहिती दिली आहे. यात तो एक्स कपल आणि सध्याचं कपल असी कंसेप्ट घेऊन काम करणार आहे. टीव्हीमुळेच लोक मला ओळखू लागले हे सांगताना सलमान खान म्हणतो की, “लोकांना माझ्या सिनेमातील व्यक्तिरेखा आवडतात, त्यांच्या त्या लक्षातही राहतात. परंतु दस का दम, बिग बॉस यांसारख्या शोमधून मी जसा प्रत्यक्षात आहे तसा लोकांपर्यंत पोहोचतो.” असे सलमान खान म्हणाला.

सिने जगत –

…म्हणून सनी लिओनी उत्‍तर प्रदेशची स्थानिक भाषा शिकतेय

‘लाल सिंह चढ्ढा’ मध्ये पुन्हा ‘थ्री इडियट’ची जोडी आमिर खान व करिना कपूर घालणार प्रेक्षकांना ‘भुरळ’

#Video : भोजपुरीचं सर्वात लोकप्रिय ‘ऑनस्क्रीन’ कपल झालं ‘विभक्‍त’ ; पण, त्यांचा जुना व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

पुजा गुप्ताचे ‘ते’ फोटो सोशलवर व्हायर

Loading...
You might also like