Coronavirus : राज्यात 729 नवे रुग्ण तर 31 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 9318 ‘कोरोना’बाधित आणि 400 बळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा वाढता आलेख मंगळवारीही कायम राहिला. गेल्या २४ तासात राज्यात तब्बल ७२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ९ हजार ३१८ झाली आहे. राज्यात मंगळवारी एका दिवसात ३१ जणांचा मृत्यु झाला आहे. त्याचवेळी राज्यात गेल्या २४ तासात १०६ जण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १ हजार ३८८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत तर ४०० जणांचा बळी गेला आहे.

राज्यात सर्वाधिक कोरोना बाधित मुंबईमध्ये आढळून येत आहे. मुंबईत आतापर्यंत ६ हजार १६९ कोरोना बाधित रुग्ण असून २४४ जणांचा मृत्यु झाला आहे. त्याखालोखाल पुणे जिल्ह्यात १ हजार४९१ रुग्ण आहेत. ठाणे शहरात ३४४, कल्याण डोंबिवली १५३, मीरा भाईदर १२३, वसई विरार मनपा १२३, पालघर ४१, पनवेल ४४,  मालेगाव १७१, सोलापूर मनपा ७५, सातारा ३२, सांगली २६, औरंगाबाद मनपा ८९, लातूर १२, यवतमाळ ७१, नागपूर मनपा १३१ कोरोना बाधित आढळून आले आहेत.

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड जिल्हा, लातूर मनपा, परभणीमध्ये अजूनपर्यंत एकही कोरोना बाधित आढळून आलेला नाही. राज्यात सध्या १ लाख ५५ हजार १७० लोक होम क्वारंटाईनमधून असून ९ हजार ९१७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.