मृत समजून 73 वर्षीय ज्येष्ठास तब्बल 20 तास फ्रीजरच्या बॉक्समध्ये ठेवलं, सकाळी पाहून धक्काच बसला

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाईन –   मृत समजून एका 73 वर्षीय ज्येष्ठास. तब्बल 20 तास फ्रीजर बॉक्समध्ये ठेवल्याने थंडीतून त्याचा मृत्यू झाला. तामिळनाडूच्या सलेम जिल्ह्यात विचित्र प्रकार समोर आला आहे. याबाबत आरोग्य सेवांचे संयुक्त निर्देशक डॉक्टर मालरविझी वल्लाल यांनी मृत्यूपूर्वी डेथ सर्टिफिकेट जारी करणाऱ्या खासगी रुग्णालयाविरोधात तपास सुरु केला आहे.

बालासुब्रामण्यम कुमार (73) असे मृताचे नाव आहे. उपचारादरम्यान रुग्णालयाकडून डेथ सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ज्येष्ठांचे भाऊ त्यांना घरी घेऊन आले. त्यानंतर फ्रीजर बॉक्समध्ये ठेवले. दुस-या दिवशी सकाळी त्याच्या शरीरात हालचाली होत असल्याची लक्षण पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन आले.मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

याबाबतची माहिती अशी की, मृत बालासुब्रामण्यम कुमार (73) यांच्या पत्नीचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांना मुलं नव्हती. ते त्यांचे भाऊ सरावनन यांच्यासोबत राहत होते. बालासुब्रामण्यम यांची तब्येत बिघडल्यानंतर सरावनन यांनी त्यांना सलेम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेथील डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट जारी करीत रुग्णाला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. सरावनन म्हणाले की, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर भावाला घरी आणण्यात आल. घरी आणल्यानंतर त्यांनी भाड्याने फ्रीजिंग बॉक्स ऑर्डर केला. बॉक्स आल्यानंतर भावाची बॉडी त्या बॉक्समध्ये ठेवली. दुसऱ्या दिवशी जेव्हा कंपनीचे लोक बॉक्स घेण्यासाठी आले तेंव्हा फ्रीजरमध्ये ठेवलेल्या व्यक्तीच्या शरीरात जीवंतपणा असल्याची लक्षणं दिसली. याबाबत सरावननने विचारले असता भावाच्या शरीरातून आत्मा निघण्याची वाट पाहत असल्याचे सांगण्यात आले.कर्मचाऱ्यांनी स्थानिक नगरसेवकाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर याबाबत पोलिसांनाही कळविण्यात आले.या प्रकरणात सरावनन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.