स्वाभीमानीच्या उपसरपंचाकडून गुटख्यासह ७४ लाखांची रोकड जप्त

जयसिंगपुर : पोलीसनामा ऑनलाईन – स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून निवडून आलेल्या संभाजीपूच्या उपसरपंचाकडून निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने ७४ लाख ६५ हजार २०० रुपयांची रोकड जप्त केली आहे. तसेच त्यांचा गोदामात सुपारीची शेकडो पोती, गुटख्याचे बॉक्स, पॅकींग मटेरियलसह साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी उपसरपंचाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

गौसमहंमद उर्फ बरकत अन्वर गवंडी (वय. ४७, रा. कचरे हाउसिंग सोसायटी, संभाजीपुर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

जयसिंगपुरमधील बाराव्या गल्लीत बरकत गवंडी यांचे तंबाखूविक्रीचे दुकान आहे. तसेच संभाजीपूर येथे त्यांचे गोदामही आहे. या गोदामात गुटखा असल्याचे माहिती मिळ्यानंतर तहसीलदार गजानन गुरव, सहायक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांसह छापा टाकला. त्यावेळी दुकानातून क महिला हातात तीन बॅगा घेऊन पळून जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर महिलेने पोलिसांना पाहून बॅगा तेथेच टाकून पळ काढला. पोलिसांनी या बॅगा पाहिल्या तेव्हा त्यात ७४ लाख ६५ हजार २०० रुपयांची रोकड बॅगेत मिळून आली.

तसेच गवंडी टोबॅको गोदामावर टाकलेल्या छाप्यात शेकडो सुपारीची पोती, गुटख्याचे शेकडो बॉक्स, सुपारी फोडण्याची मशीन, पॅकेजिंग मटेरीयल जप्त करण्यात आले.

दरम्यान सापडलेली रक्कम ही निवडणूकीकरता आणली होती का याचा तपास आयकर विभाग, केंद्रीय जीएसटी विभाग यांच्याकडून तपास सुरु आहे.