बेकायदा विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी 74 वाहने जप्त

सांगलीः पोलीसनामा आॅनलाईन-

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवाणगी गरजेची असेत. मात्र शहरात अनेक वाहन चालक शालेय विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करत असल्याची माहिती समोर आली आहे. विनापरवाना, बेकायदा वाहतूकीला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखा व आरटीअो विभागाने संयुक्त मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान, विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करणारी तब्बल 74 वाहने जप्त करण्यात आली असून,  यामध्ये रिक्षा, व्हॅन, एक स्कूल बसचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाकजवळ झालेल्या स्कूल बसच्या अपघातानंतर सांगली आणि मिरजेत बुधवार सकाळपासून कारवाईला प्रारंभ करण्यात आला. पोलिसांची वाहतूक शाखा आणि आरटीओ  यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6a361888-7a12-11e8-be42-578559c12cb5′]

कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाकजवळ स्कूल बस आणि कंटेनरच्या अपघातात तीन जण ठार  झाल्यानंतर पोलिस आणि आरटीओ कार्यालयाने विनापरवाना आणि बेकायदा विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाईस सुरुवात केली आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, आरटीओ विलास कांबळे यांनी संबंधितांना अशी वाहने पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश संयुक्त पथकाला दिले आहेत.

अधीक्षक शर्मा, कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल निकम, अभिजित देशमुख, आरटीओ निरीक्षक संदीप पाटील, शंभुराजे पवार यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी सकाळापासून बेकायदा विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने जप्त करण्याची कारवाई सुरू केली. यामध्ये सांगली आणि मिरजेत मिळून आतापर्यंत 74 वाहने जप्त करण्यात आली आहे. या वाहनांचे विद्यार्थी वाहतुकीच्या परवान्यासह पासिंग, कागदपत्रे तपासण्याचे काम संयुक्त पथक करत आहे.

कारवाई यापुढे देखील अशीच सुरू राहणारः

ज्या वाहनांच्या कागदपत्रे, परवान्यांमध्ये त्रुटी आहे अशा वाहनांना मेमो देण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी दुपारपर्यंत 24 वाहनधारकांना मेमो देण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत पोहोच केल्यानंतरच ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. याबाबत प्रत्येक शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहन मालक आणि चालकांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. ही कारवाई रोज सुरू राहणार असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक अतुल निकम यांनी दिली आहे.

रिक्षा चालकांनी कारवाई मागे घेण्याची केली विनंती-

यावेळी सांगली आणि मिरज शहरातील विविध रिक्षा संघटनांच्या संयुक्त शिष्टमंडळाने पथकातील अधिकार्‍यांची भेट घेऊन कारवाई मागे घेण्याची विनंती केली. मात्र कागदपत्रे तसेच परवाना नसलेल्या रिक्षांवर कारवाई करण्यावर ठाम असल्याचे यावेळी अधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी महादेव पवार, फिरोज मुल्ला यांच्यासह रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच परवान्यासाठी देखील वाहन चालकांनी वेळ मागीतला आहे. अन्यथा संपूर्ण जिल्ह्यातील रिक्षा बंदचे आंदोलन करु असा इशारा संघटनांनी दिला आहे. दरम्यान व्हॅन चालक, मालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनीही पथकातील अधिकार्‍यांची भेट घेऊन चर्चा केली. परवाना नसलेल्या व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूक केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही अधिकार्‍यांनी त्यांना सांगितले. यावेळी पदाधिकार्‍यांनी परवाने घेण्यासाठी वेळ द्यावी अशी मागणीही केली.
[amazon_link asins=’B0785JJF7L,B06Y66GKGN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’81af4fc7-7a12-11e8-9d43-0b14382205c9′]

पालकांना काळजी घेण्याचे पोलीस अधीक्षक शर्मा यांचे आवाहनः

बेकायदा आणि विनापरवाना विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनांमधून पालकांनी आपल्या पाल्यांना पाठवू नये. सुरक्षिततेचे सर्व नियम पालन करणार्‍या अधिकृत वाहनांमधूनच विद्यार्थ्यांना पाठवावे. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे अपघात झाल्यानंतर जागे होण्यापेक्षा पालकांनी आताच जागरूक होणे गरजेचे आहे. आपली मुले सुखरूप शाळेत जावीत तसेच यावीत यासाठी पालकांनीही विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केले आहे.