75 Rs New Currency Launch | अर्थमंत्रालाची घोषणा, बाजारात येणार ७५ रुपयांचे नवे चलन; नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी करणार लाँच

दिल्ली : वृत्तसंस्था – 75 Rs New Currency Launch | देशातील नव्या संसदभवनाचे (New Parliament House) उद्घाटन येत्या २८ मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते होणार आहे. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने साकारण्यात आलेले हे नवीन संसद भवन देशाच्या इतिहासाला, संस्कृतीला नव्या युगाची किनार देणार आहे. संपूर्ण देशात या नवीन संसद भवनाविषयी कुतूहल व उत्सुकता आहे. दरम्यान देशाच्या अर्थ मंत्रालयानेही (Ministry of Finance) एक मोठी घोषणा केली आहे. नवीन संसद भवन उद्घाटनाच्या स्मरणार्थ ७५ रुपयांचे नाणे देशाला सुपूर्त केले जाणार आहे. (75 Rs New Currency Launch)

२८ मे ला पार पडणारा हा उद्घाटन सोहळा अत्यंत महत्त्वाचा आणि लोकशाहीचे एक उज्ज्वल पर्वाचे प्रतीक असणार आहे.
या उद्घाटनाला सगळ्या पक्षांनी उपस्थिती लावावी अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा असली तरी २० विरोधी पक्षांनी यावर आधीच बहिष्कार (Boycott By Oppositions) टाकला आहे.
उद्घाटनाचा वाद सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेला असून त्यावरून राजकीय खडाजंगी सुरु आहे.
मात्र या सर्व राजकीय नाट्यमय घडामोडींमध्येच आता अर्थमंत्रालयाकडून नव्या चलानाची घोषणा करण्यात
आली आहे.

अर्थमंत्रालयाने या ७५ रुपयांच्या नव्या चलनाबद्दल माहिती देताना सांगितले आहे की, हे नवीन चलन नाणे (Coin) स्वरूपाचे असणार असून ते गोलाकार पद्धतीचे असेल.
या ७५ रुपये नाण्याचा व्यास (Diameter) ४४ मिलीमीटर असणार आहे.
हे नाण तयार करण्यासाठी ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के जस्त असलेले चतुर्थांश मिश्रधातू वापरण्यात येणार आहे.
तसेच या नाण्यावर संसद परिसर आणि नवीन संसद भवनाची प्रतिमा असेल.
संसद परिसराच्या प्रतिमेच्या खाली आंतरराष्ट्रीय अंकांमध्ये ‘2023’ हे वर्ष देखील कोरलेले असणार आहेत. (75 Rs New Currency Launch)

Web Title : 75 Rs New Currency Launch | Finance Minister’s announcement, new currency of Rs 75 in the market; It will be launched on the occasion of the inauguration of the new Parliament building

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News |  ‘एकनाथ शिंदे गारुडी तर देवेंद्र फडणवीस…’, सापनाथ-नागनाथ टीकेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल

ACB Demand Case | देशी दारूची विक्री करता अशी विचारणा करून दर महिन्याला एक केस व मासिक हप्ता? पोलिसावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

New Education Policy | पुढील वर्षी दहावी- बारावी बोर्डाची परीक्षा होणार का नाही?, याबाबत राज्य मंडळाचे अध्यक्षांचे स्पष्टीकरण