75 ते 80 % विद्यार्थ्यांनी दिली JEE Main 2020 परीक्षा, 11 सप्टेंबरपर्यंत जाहीर होऊ शकतो निकाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरातील इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आयोजित जेईई मेन सप्टेंबर 2020 रविवारी झाली. सुमारे 75 ते 80 टक्के विद्यार्थ्यांनी जेईईमध्ये उपस्थिती नोंदवली. नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) 11 सप्टेंबरपूर्वी जेईई मेन सप्टेंबर 2020 चा रिझल्ट जारी करणार आहे.

जेईई मेनच्या जानेवारी आणि सप्टेंबरमध्ये आयोजित दोन्ही परीक्षांमध्ये बेस्ट स्कोअरच्या आधारावर जेईई मेन 2020 ची मेरिट लिस्ट जारी होईल. याच मेरिस्ट लिस्टमधील टॉप अडीच लाख विद्यार्थी आयआयटीमध्ये प्रवेशासाठी अ‍ॅडव्हान्स परीक्षेत सुद्धा भाग घेतील. तर याच मेरिटवरून देशभरातील इंजिनियरिंग कॉलेज पदवी म्हणजे बीटेक आणि बीईमध्ये प्रोग्राममध्ये प्रवेश देतील.

नॅशनल टेस्टींग एजन्सीने एक ते सहा सप्टेंबरपर्यंत देशभरात जेईईचे आयोजन केले होते. कोविड-19 संसर्गापासून बचाव आणि सुरक्षेसाठी विशेष नियमांतर्गत 660 परीक्षा केंद्रांमध्ये परीक्षांचे आयोजन केले होते. परीक्षेसाठी 8.58 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

पहिल्या दिवशी 85 टक्के उपस्थिती
जेईईच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती 85 टक्केपर्यंत होती. तर शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घसरण झाली. मात्र, एक ते सहा सप्टेंबरपर्यंत दोन-दोन शिफ्टमध्ये आयोजित परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 ते 85 टक्केपर्यंत होती.

नीट परीक्षार्थींना मेट्रोमध्ये मिळू शकतोफ्री प्रवास
मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस प्रोग्राममध्ये प्रवेशासाठी 13 सप्टेंबरला आयोजित होणार्‍या नीटची तयारी आता सुरू झाली आहे. एनटीएने नीटसाठी दुसर्‍यांदा राज्यांना पत्र लिहिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीसह एनसीआरच्या नीटमध्ये भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी दिल्ली मेट्रोच्या फ्री प्रवासाची संधी मिळू शकते. मात्र, सरकार आणि मेट्रोन यावरत अंतिम निर्णय अजून घेतलेला नाही. परंतु, विद्यार्थ्यांना सहजपणे सेंटरपर्यंत पोहचण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टअंतर्गत यावर सूट देण्याची योजना आहे.