कौतुकास्पद ! मुलगा आणि सुनेमुळं ‘त्या’ ज्येष्ठ पत्रकाराने सगळी ‘मालमत्‍ता’ सरकारला केली ‘दान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओरिसामधील एका गावात आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या त्रासाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने आपली सर्व संपत्ती सरकारच्या नावे केली आहे. ज्येष्ठ पत्रकार असलेल्या या वृद्ध व्यक्तीने सर्व जमीन सरकारला दान करत या जागेवर वृद्धाश्रम बांधण्याची विनंती केली. जेणेकरून तो आपले उर्वरित आयुष्य त्या वृद्धाश्रमात व्यतीत करू शकेल.

ओरिसामधील दशरथपुर प्रखंड तालुक्यातील मुरारीपुर या गावातील हि घटना असून येथील ७५ वर्षीय खेत्रमोहन मिश्रा यांनी म्हटले कि, त्यांचा मुलगा आणि सून त्यांना व्यवस्थित वागणूक देत नसून मी माझी सर्व संपत्ती सरकारच्या नावावर केली असून त्याठिकाणी वृद्धाश्रम उभारण्याची मागणी केली. आणि उर्वरित आयुष्य मी त्या वृद्धाश्रमात व्यथित करू शकेल. या प्रकरणाविषयी बोलतांना जाजपुरचे जिल्हाधिकारी रंजन के दास यांनी सांगितले कि, या आजोबांची राहण्याची व्यवस्था आम्ही जिल्ह्यातील एका वृद्धाश्रमात केली असून मृत्यूनंतर त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या स्वाधीन न करण्याची त्यांनी आम्हाला विनंती केली आहे.

दरम्यान, कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दान केलेल्या जमिनीवर प्रशासनाने वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेतला असून लवकरच याचे काम सुरु करण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like