750 प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या (PSI) पदांना मुदवाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्य पोलीस दलात निवडण्यात आलेल्या 750 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रशिक्षणाच्या 55 दिवासांची मुदत वाढवण्यात आली आहे. निवडणूक व त्यानंतर अधिवेशन काळात बंदोबस्तासाठी या उपनिरीक्षकांना तैनात करण्यात आले होते. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांना पुन्हा या कालावधीत प्रशिक्षण घ्यायचे आहे. गृह विभागाच्यावतीने त्याबाबतचे आदेश नुकतेच आदेश काढण्यात आले होते.

राज्य लोकसेवा आयोगाने 2016 मध्ये घेतलेल्या उपनिरीक्षक पदाच्या सरळ सेवेच्या परीक्षेतून 724 उमेदवारांची निवड निश्चित केली होती. तसेच सत्र क्रमांक 114 मधील मुदतवाढ मिळालेले 26 उमेदवार अशी एकूण 750 उमेदवाराची नाशिक येथील पोलीस अकादमीमध्ये एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती.

मात्र, प्रशिक्षण कालावधीमध्ये त्यांना निवडणूक आणि हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे मागील वर्षी 24 ऑक्टोबर ते 17 डिसेंबर या कालावधीत प्रशिक्षणामध्ये खंड पडला होता. त्यामुळे 750 उपनिरीक्षकांना 55 दिवसांची मुदवाढ देण्याचा प्रस्ताव गृह खात्याला देण्यात आला होता. त्याला गृह खात्याने मंजुरी दिली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/