वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३२ हजार जणांकडून ७६ लाखांचा दंड वसूल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी पुणे वाहतुक शाखा, पुणे महापालीका प्रशासनाने संयुक्तीक रित्या मोहीम राबविण्यात आली होती. शुक्रवारी (दि.१९) पासून ही मोहीम राबविण्यात येत होती. या मोहीमेत ३२ हजार ५२५ जणांवर केसेस दाखल करुन ७६ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

पुणे महापालिका आणि पुणे वाहतुक शाखा यांच्या वतीने संयुक्तीक रित्या ‘नो ट्रॅफिक रुल व्हायोलेशन झोन’ मोहीम राबविण्यात आली होती. या संयुक्तीक कारवाईत एका आठवड्यात ही कारवाई करण्यात आली आहे. वाहतुक शाखेने पाच परिमंडळमध्ये ही मोही राबविली होती. ही मोहीम पुणे शहर पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम् यांच्या सुचनेनुसार वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक शाखेच्या पाच परिमंडळमध्ये राबविण्यात आली.

या मोहीमेत मोटार वाहन कायद्याप्रमाणे १४ हजार ७०२, सीसीटीव्ही द्वारे १७ हजार ७०६ व महानगरपालिका नियमाप्रमाणे १०७ असे एकूण ३२ हजार ५१५ जणांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. केसेस दाखल करण्यात आलेल्या वाहन चालकांकडून ७६ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या १४६ वाहनचाकांवर केसेस दाखल करण्यात आला आहेत. तर महापालिकेतर्फे वाहतुकीस अडथळा होणारे ४४१ अतिक्रमण आणि हॉकर्स काढण्यात आले आहेत.
वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंड पालन करुन शहरातील वाहतुक सुरळीत राण्यासाठी वाहतूक शाखेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.