पिंपरीतील 76 ठिकाणे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने 76 ठिकाणे ‘कंटेन्मेंट’ झोन (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करण्यात आले आहेत. या क्षेत्रातील निर्बंध कडक केले आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 19 ते 27 एप्रिल दरम्यान संपुर्ण पिंपरी-चिंचवड शहर ‘कंटेन्मेंट’ झोन (प्रतिबंधिक क्षेत्र) म्हणून घोषित केले होते. त्यानंतर रुग्ण वाढीचा दर कमी झाल्याने सक्रिय रुग्ण असलेली 21 ठिकाणेच ‘कंटेन्मेंट’ झोन जाहीर केली होती. त्यानंतर ज्या भागात रुग्ण वाढतील तो भाग ‘कंटेन्मेंट’ झोन घोषित केला जात आहे.

पिंपरीतील तपोवन रोड, फुगेवाडी, बॉम्बे कॉलनी दापोडी, खराळवाडी, बौध्दनगर, पिंपरी कॅम्प सीझेड, भाटनगर, मोहननगर, शुभश्री सोसायटी आकुर्डी, आकुर्डी म्हाळसाकांत चौक, पिंपळेगुरव येथील शिवनेरी कॉलनी, जगताप कॉम्प्लेक्स, विनायकनगर, कवडेनगर, पिंपळेनिलख येथील शिवाजी चौक परिसर, पिंपळेसौदागर येथील शुभश्रि रो हाऊस सोसायटी परिसर, गणेशम सोसायटी, साई पॅराडाईज, जुनी सांगवीतील मधुबन सोसायटी परिसर, चिंचवडमधील इंदरानगर, आनंदनगर, काळेवाडी, तापकीर चौक, छत्रपती चौक रहाटणी, शिवराजनगर , ज्ञानआंगण सोसायटी रहाटणी, पवनाननगर जुनी सांगवी, सद्गुरु कॉलनी वाकड, श्रीकृष्ण कॉलनी, तांबे शाळा, वाल्हेकरवाडी, आकाश राज रावेत, थेरगावातील 16 नंबर बसस्टॉप, दत्तनगर, डांगे चौक, कावेरीनगर वाकड पोलीस लाईन, गायकवाड चाळ काळेवाडी, विकासनगर, बापदेवनगर किवळे, किवळे गावठाण, आंबेडकरनगर, ढोरेनगर जुनी सांगवी, प्रेस्टिज बिल्डिंग चिंचवड, पवनानगर काळेवाडी, मधुरा कॉलनी वाल्हेकरवाडी, कस्पटे वस्ती वाकड,
भोसरीतील लांडगेनगर, गुरुविहार कॉलनी हुत्मात्मा चौक, चक्रपाणी वसाहत, हनुमान कॉलनी भोसरी, क्षितीज डेस्टीनेशन सोसायटी भोसरी, अलंकापुरुम रोड परिसर, शास्त्री चौक, महादेवनगर, धावडेवस्ती, मोशीतील गंधर्वनगरी परिसर, बनकर वस्ती, वुड्सविले, दिघीतील विजयनगर, तनिष्क आयकॉन, अमृतधारा सोसायटी दिघी, च-होलीतील साठेनगर, निकम वस्ती, अलंकापुरम सोसायटी वडमुखवाडी, रुपीनगर, पंचादुर्गा सोसायटी रुपीनगर, सहयोगनगर, तळवडेतील न्यू एन्जल स्कूल, ताम्हाणेवस्ती, संभाजीनगर येथील बजाज स्कूल परिसर, आंब्रेला गार्डन, मोरेवस्ती चिखली, शरदनगर चिखली, बालघरेवस्ती चिखली, डेस्टिनेशन मेमियर चिखली परिसर हा भाग ‘कंटेन्मेंट’ झोन मध्ये आहे.