COVID-19 : भारतातील ‘कोरोना’चा पहिला बळी, मृत्यूच्या 24 तासानंतर अहवाल मिळाल्यानं माहिती समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. महाराष्ट्रासह राजस्थानातही कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. दिल्लीनंतर आर्थिक राजधानी मुबंईतही कोरोनाचा रुग्ण आढळून आले आहेत. या सगळ्यानंतर कर्नाटकमध्ये एका 76 वर्षीय वृद्धाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील कलबुर्गीमधील 76 वर्षीय वृद्धाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याची हि भारतातील पहिली घटना आहे.

काल दिनांक ११ मार्च रोजी या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे असा संशय होता. आज त्याबाबत अहवाल येऊन आरोग्य आयुक्तांकडून त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळेच झाला असे स्पष्ट करण्यात आले.

कर्नाटकातील कलबुर्गीमधील सदर 76 वर्षीय वृद्धाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. सदर व्यक्ती कोरोनाग्रस्त आहे असा संशय असल्याची माहिती सरकारनं दिली होती. परंतु अद्याप या व्यक्तीचा वैद्यकीय चाचणीचा अहवाल समोर आलेला नव्हता. वैद्यकीय चाचणीचा अहवाल समोर आल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळेच झाला हे स्पष्ट झाले आहे.