773 शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपया, विमा कंपन्यांकडून क्रूरचेष्टा

बीड:पोलीसनामा ऑनलाईन

हवामानातील बदलामुळे तसेच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आधीच हैराण झाला आहे. त्यात आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम एका रुपयांपासून ते अनेक रुपयांपर्यंत जमा झाल्याचे आपण ऐकले आहे पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नसून बीड मध्ये तब्बल ७७३ शेतकऱ्यांना एक रुपाया आणि ६४९ शेतकऱ्यांना २ रुपये ,५० शेतकऱ्यांना ३ रुपये ,७०२ शेतकऱ्यांना ४ रुपये ,३९ शेतकऱ्यांना ५ रुपये एवढीच रक्कम  खात्यावर जमा  केली आहे.
[amazon_link asins=’B074L18D3W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2a41752f-8446-11e8-866c-bbada918b0c7′]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, खरेतर बीड जिल्ह्याने  पीक विमा भरून घेण्यात देशात पहिला नंबर मिळवला होता. जिल्हा बँकेच्या नांदुरघाट शाखेतून १५६९१ शेतकऱ्यांनी युनाटेड इन्शुरन्स कंपनीकडे ५१ लाख ४२ हजार रुपयांचा विम्याचा हप्ता भरला होता. मात्र विमा कंपनीने भरपाईपोटी  शेतकऱ्यांनाच्या खात्यात चक्क एक रुपायापाससून पाच रुपये टाकून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. बीडमधील ७७३ शेतकऱ्यांना एक रुपया, ६४९ शेतकऱ्यांना दोन रुपये, ५० शेतकऱ्यांना तीन रुपये, ७०२  शेतकऱ्यांना चार रुपये, ३९ शेतकऱ्यांना पाच रुपये एवढीच रक्कम खात्यावर जमा झाली आहे. पिकांचे  नुकासन झाले  म्हणून या शेतकऱ्यांना एव्हढी ‘मोठी’ रक्कम पीकविम्यारुपी भरपाई म्हणून मिळाली आहे.

लहरी हवामान, पावसाची अनिश्चितता अशा विविध कारणांमुळे नापिकी झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पीकविमा योजना आणली खरी पण अशी रक्कम खात्यात टाकून पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांची अशी थट्टा सुरु आहे. त्यामुळे सरकारची पीकविमा योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी की, विमा कंपन्यांसाठी आहे असा प्रश्न शेतकऱ्यां पडला आहे.
[amazon_link asins=’B0722R5XHW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3458c563-8446-11e8-b324-d7b663c89793′]