Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा धोका वाढला ! गेल्या 24 तासात आतापर्यंचे विक्रमी 19218 नवे पॉझिटिव्ह तर 378 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे सरकारची चिंता वाढली आहे. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा साडे आठ लाखांच्यावर गेला आहे. गेल्या 24 तासात राज्यात विक्रमी 19 हजार 218 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना बाधित रुगणांची संख्या 8 लाख 63 हजार 062 इतकी झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19.32 टक्के इतके आहे.

कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. गेल्या 24 तासात 13 हजार 289 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 6 लाख 25 हजार 773 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.51 टक्के आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 378 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 25 हजार 964 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 3.01 टक्के आहे.

सध्या राज्यात 2 लाख 10 हजार 978 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यामध्ये सध्या 14 लाख 51 हजार 343 होम क्वारंटाईन आहेत. तर 36 हजार 873 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत राज्यात 44 लाख 66 हजार 249 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 8 लाख 63 हजार 062 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरीत रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.