Coronavirus : राज्यात चिंताजनक परिस्थिती ! 24 तासात ‘कोरोना’चे 7862 नवे रुग्ण तर 226 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली असून राज्याची चिंता वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 7862 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित रुग्ण 5 ते 6 हजाराच्या दरम्यान आढळून येत होते. मात्र, आजची आकडेवारी सर्वांना धडकी भरवणारी आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 38 हजार 461 इतकी झाली आहे.


राज्यात 226 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यू होण्याचे प्रमाण 4.15 टक्के आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 5366 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 132625 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.62 टक्के आहे. तर राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19.01 टक्के आहे.

राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 238461 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 9893 वर गेला आहे. राज्यात सध्या 674025 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 46560 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात 95647 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.