धक्कादायक ! ‘सरस्वती’ची पूजा पाहून परतत होती इयत्ता 7 वी तील विद्यार्थीनी, 6 युवकांनी केला सामुहिक बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या वैशालीमध्ये सातवीच्या विद्यार्थींनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. पूजा करुन घरी येणाऱ्या विद्यार्थींनीचा 6 तरुणानी सामूहिक बलात्कार केला. ही धक्कादायक घटना वैशाली जिल्ह्यातील पातेपुरमध्ये घडली.

पातेपुर डरुआची एक 7 वीत शिकत असणारी विद्यार्थींनी आपल्या मैत्रिणींसोबत गावातील सरस्वती पूजा पाहून परत येत होती. रस्त्यात 3 मोटार सायकलवर आपल्या 6 तरुणांनी या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले आणि गावातील निर्जनस्थळी घेऊन गेले. 30 जानेवारीची ही घटना असून नातेवाईक पोलिसात तक्रार देण्यास घाबरत होते.

तक्रार दाखल –
या घटनेनंतर काही लोकांनी आवाज उठवला. यानंतर नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसात दाखल तक्रारीत मुलीने 6 आरोपींपैकी एकाला ओळखले आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत.

आमच्यासोबत चल नाही तर… –
घटनेनंतर पीडितेने सांगितले की आम्ही प्रसाद घेण्यासाठी जात होते. मी जिच्यासोबत गेले होते ती पुढे निघून आली. त्यानंतर एक मुलगा पाठलाग करत आला आणि म्हणाला की आमच्या सोबत चल नाहीत कापून फेकून देऊ. मी नकार दिल्यावर माझे तोंड दाबून मला उचलून नेऊन माझ्यासोबत नाही नाही ते केले. ते 6 जण होते आणि त्यांच्याकडे तीन वाहनं होती, एकाला मी ओळखते.