7th Pay Commission । केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी ! बँक अकाऊंटमध्ये जमा होणार 2,18,000 रूपये; जाणून घ्या कसे

मुंबई न्यूज (Mumbai news)  : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – 7th Pay Commission । केंद्र सरकारच्या (Central Government) कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employee’s) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अधिक काळापासून महागाई भत्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या सरकारी कर्मचार्‍यांचा वाढलेला पगार (salary) आहे. तो सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे. याअगोदर जुलै महिन्याच्या कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या महागाई भत्याचे (DA) पैसे असल्याची अपेक्षा होती. मात्र, आता याच स्पष्टीकरण समोर आलं आहे की, सप्टेंबर अखेर पगारासह शेवटचे 3 हप्ते देखील मिळणार आहे. (218200 rupees will come in the account of central government employees)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Government Employee’s) सप्टेंबर महिन्याच्या पगारामध्ये मोठी वाढ मिळणार आहे. केंद्राच्या (Central Government) या नवीन निर्णयावरून तुमच्या पगारात किती वाढ होणार आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमचा मूळ पगार माहीत असणं महत्वाचे आहे. दरम्यान, आपण आपला वर्तमान महागाई भत्ता (DA) बघू शकता. सध्या हे हे 17 टक्के आहे जे महागाई भत्याच्या (DA) वाढीनंतर 28 टक्क्यांपर्यंत जाणार आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मासिक महागाई भत्यामध्ये साधारण 11 टक्के वाढ होईल. याचप्रमाणे अशा पद्धतीने 1 जुलै 2021 रोजी पासून महागाई भत्ता (DA) मूलभूत पगाराच्या 11 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. याबरोबरच असे सूत्र डीआरच्या गणनातही लागू होणार आहे.

या दरम्यान, केंद्रीय कर्मचार्‍यांचा (Central Government Employee’s) महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांना महागाई सवलतीत थोडा वेळ लागणार आहे. मात्र, त्यांचे वेतन चांगले वाढेल. वर्ग 1 अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) थकबाकी 11 हजार 880 ते, 37 हजार 544 रुपयांच्या दरम्यान असेल. आणि स्तर-13 अर्थात सातव्या वेतन आयोगानुसार मूलभूत वेतनश्रेणीची किंमत 1 लाख 23 हजार 100 ते 2 लाख 15 हजार 900 तेव्हा पातळी, 14 पर्यंत मोजली गेली तर केंद्र सरकारच्या कर्मचार्‍याचा महागाई भत्ता (DA) थकबाकी 1 लाख 44 हजार 200 रुपये ते 2 लाख 18 हजार 200 पर्यंत असणार आहे. अशी माहिती नॅशनल कौन्सिल ऑफ JCMचे शिव गोपाल मिश्रा यांनी दिली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : 7th Pay Commission | 218200 rupees will come in the account of central government employees

हे देखील वाचा

Modi Government | मोदी सरकारची मोठी घोषणा ! MSME च्या कक्षेत होणार रिटेलर्स आणि होलसेल व्यापार्‍यांचा समावेश; पीएम मोदी म्हणाले – ‘ऐतिहासिक निर्णय’Pune News । पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Delta Plus Variant | राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ‘कोरोना’ची तिसरी लाट? 386 मुले ‘कोरोना’बाधित