7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना 2 लाख रुपये देऊ शकते सरकार, केवळ घोषणेची प्रतीक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना (Central Government Employee) सरकार पुढील महिन्यात मोठी भेट देऊ शकते. केंद्र सरकार (Central Government) कर्मचार्‍यांचा जुलै महिन्यातील थकित डीए (Due DA) जमा करू शकते, असे वृत्त आहे. यासोबतच कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात (DA Hike) ही घोषणा केली जाऊ शकते. (7th Pay Commission)

 

जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत सरकारी कर्मचार्‍यांना अद्याप डीएचे पैसे मिळालेले नाहीत. ती थकबाकी भरण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.

 

कोविड (Covid) मुळे सरकारने डीए रोखून धरला होता. आता 18 महिन्यांची डीएची थकबाकी सरकार लवकरच देऊ शकते, असे बोलले जात आहे.

 

सरकार दोन लाख रुपये देऊ शकते

सरकार कर्मचार्‍यांच्या खात्यात एकदाच 2 लाख रुपये टाकू शकते, असे बोलले जात आहे. कर्मचार्‍यांना त्यांच्या सॅलरी बँडनुसार डीएची थकबाकी मिळेल. जर सरकारने डीएची थकबाकी जमा केली, तर लेव्हल 1 कर्मचार्‍यांची डीए थकबाकी 11880 ते 37000 रुपयांपर्यंत असू शकते. (7th Pay Commission)

त्याच वेळी, सरकार स्तर 13 कर्मचार्‍यांना 1,44,200 ते 2,18,200 रुपये डीए थकबाकी देऊ शकते.

 

वाढू शकतो डीए

जुलै महिन्यात सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये 4 ते 5 टक्के वाढ करू शकते.
मात्र, सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Advt.

मात्र, वाढती महागाई पाहता सरकार आपल्या कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये वाढ करून दिलासा देऊ शकते, असे मानले जात आहे.
सध्या कर्मचार्‍यांना 34 टक्के दराने डीए मिळत आहे. मार्चमध्ये सरकारने महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला होता.

 

कर्मचार्‍यांना मिळेल लाभ

महागाईचे आकडे लक्षात घेऊन सरकारने कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला तर 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल.
सरकारी कर्मचार्‍यांना दिलेला डीए हा त्यांच्या आर्थिक मदत सॅलरी स्ट्रक्चरचा भाग आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission 18 months da arrears likely to be pay in july rs 2 lakh given

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा