7th Pay Commission | कॅबिनेटच्या निर्णयानंतर 20 हजारापासून 56 हजारपर्यंत बेसिक मिळणार्‍यांच्या पगारात होणार जबरदस्त वाढ, जाणून घ्या कॅलक्युलेशन

नवी दिल्ली : 7th Pay Commission | गुरुवारी केंद्र सरकार (central government) ने 3 टक्के महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) वाढवण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (central govt. employees) पगारात जबरदस्त वाढ होणार आहे. वाढलेला महागाई भत्ता 1 जुलैपासून लागू होईल. मात्र अद्याप महागाई भत्त्याच्या एरियर (arrears of DA) बाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. ही घोषणा पीएम मोदी (PM Modi) लवकरच करू (7th Pay Commission) शकतात.

20 हजार मुळ पगार असलेल्यांना किती फायदा

जर एखाद्या कर्मचार्‍याची बेसिक सॅलरी 20 हजार रुपये आहे तर त्याचा महागाई भत्ता 31 टक्केच्या हिशेबाने 6200 रुपये होईल. जुलैपासून आतापर्यंत महागाई भत्त्यात 14 टक्केच्या हिशेबाने 2800 रुपयांची वाढ दिसून (7th Pay Commission) आली आहे.

56000 मुळ पगार असलेल्या किती वाढ

जर एखाद्या अधिकार्‍याचा मुळ पगार 56000 रुपये असेल तर 31 टक्के महागाई भत्त्याच्या हिशेबाने 17360 रुपये होईल. 17 टक्केवरून महागाई भत्ता आता 31 टक्के झाला आहे. अशावेळी यामध्ये वाढ 7840 रुपये प्रति महिना झाली आहे.

18 महिन्याच्या एरियरची अजूनही प्रतीक्षा

आता कर्मचार्‍यांना 18 महिन्यांच्या एरियरची प्रतीक्षा आहे, जो जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत कर्मचार्‍यांना कोविड काळात देण्यात आलेला नाही. कोरानामुळे केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावर प्रतिबंध लावला  होता.

परंतु प्रत्येक 6 महिन्यात वाढ करण्यात आली. जानेवारी 2020 मध्ये 4 टक्के, जून 2020 3 टक्के आणि जानेवारी 2021 मध्ये 4 टक्के वाढ झाली.
आता कर्मचारी या एरियरची मागणी करत आहेत.
मात्र सरकार तो देण्यास नकार देत आहे.
परंतु संघटनांनी पीएम मोदींना (Modi Government) पत्र पाठवून साकडे घातले आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात दिराकडून 42 वर्षीय भावजयीला ‘अनैतिक’ संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; वारजे माळवाडीमध्ये विनयभंगाचा FIR

Hydrogen Fuel | ‘पेट्रोल-डिझेल’ला राहणार नाही ’किंमत’, 2030 पर्यत ’पाण्या’वर धावतील बस-ट्रक!

Pune Crime | पुण्यातील 31 वर्षीय विवाहीतेसोबत जबरदस्तीने शरीर ‘संबंध’, ‘लगट’ केलेल्याचे व्हिडीओ FB व्दारे पतीसह नातेवाईकांना पाठवून बदनामी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : 7th Pay Commission | 7th pay commission after cabinet how much increase salary whose basic rs 20000 to rs 56000 know complete calculation marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update