7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांचा DA वाढल्यानंतर HRA मध्ये सुद्धा होईल सुधारणा, जाणून घ्या – किती वाढेल पगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी 2022 मध्ये चांगली बातमी येणार आहे. लवकरच सरकार महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्के करणार आहे आणि एकरकमी थकबाकी खात्यात जमा करणार आहे. दुसरीकडे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (central government employees ) घरभाडे भत्त्यातही (HRA) लवकरच वाढ होणार आहे. (7th Pay Commission)

 

जुलै 2021 मध्ये सरकारने DA वाढवून 28 टक्के केला होता. ज्यानंतर एचआरएमध्ये सुधारणा करण्यात आली. सध्या, HRA दर 27%, 18% आणि 9% आहेत. त्याच वेळी, ऑक्टोबर 2021 मध्ये DA 31 टक्के करण्यात आला, त्यानंतर HRA मध्ये सुधारणा अपेक्षित आहे.

 

डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेडिंगनुसार, केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी घरभाडे भत्त्यात वाढ महागाई भत्त्याच्या आधारावर करण्यात आली होती. शहरातील वर्गवारीनुसार सर्व कर्मचार्‍यांना 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के दराने लाभ मिळत आहे. त्याच वेळी, सरकारने 2015 मध्ये एक आदेश जारी केला होता, ज्यामध्ये डीए वाढीसह (DA Hike), एचआरए देखील वेळोवेळी वाढविला (HRA Hike) जाईल. HRA मधील पुढील वाढ कधी होईल ते जाणून घेवूयात. (7th Pay Commission)

एचआरएमध्ये होऊ शकते इतके टक्के वाढ –
केंद्र सरकार एचआरए दर 27 टक्क्यांवरून 30 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा डीए 50 टक्क्यांच्या पुढे असेल. कारण सरकारच्या जुन्या आदेशानुसार, जर डीए 50 टक्केच्या पुढे गेला तर एचआरए 30 टक्के, 20 टक्के आणि 10 टक्के होईल.

 

श्रेणीनुसार मिळतो HRA –
X, Y, Z वर्गाच्या शहरांनुसार केंद्रीय कर्मचार्‍यांना घरभाडे भत्ता उपलब्ध आहे.
ज्यामध्ये X श्रेणीच्या शहरात 27 टक्के HRA आणि Y श्रेणीच्या शहरात 18 टक्के HRA मिळतो.
त्याच वेळी, झेड श्रेणीतील शहरांमध्ये 9 टक्के एचआरए मिळतो.

 

HRA मध्ये X, Y, Z श्रेणी काय आहे?
50 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे X श्रेणीत येतात.
या शहरांमध्ये नियुक्त केलेल्या केंद्रीय कर्मचार्‍यांना 27% HRA मिळतो.
त्याच वेळी, Y श्रेणीतील शहरांमध्ये 18 टक्के आणि Z श्रेणीमध्ये 9 टक्के मिळतो.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission after increasing da of these workers there will be revision in hra too know how much salary will increase

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP | मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे राष्ट्रवादीच्या समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

 

Pune Crime | पार्श्वगायक अभिजित भट्टाचार्य यांची फसवणूक; व्यावसायिक गणेश केंजळेवर पुण्यात आणखी एक गुन्हा दाखल

 

Pune Crime | ‘पिंपरी-चिंचवड’च्या ‘दरोडा विरोधी’कडून 14 पिस्टल आणि 8 काडतुसे जप्त, 4 जणांना अटक