7th Pay Commission | खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात बदल; जाणून घ्या किती येईल पगार

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – 7th Pay Commission | नववर्षाच्या सुरूवातीलाच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून (Ministry Of Labor And Employment) महागाई भत्त्याच्या (DA) मोजणीचे सूत्र बदलण्यात आले आहे. याचा अर्थ म्हणजे महागाई भत्त्यात बदल केले गेले आहे. त्यानूसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती येणार याबाबत सविस्तर जाणून घ्या. (7th Pay Commission)

 

मंत्रालयाकडून पगार दर निर्देशांकची (WRI-Wage Rate Index) नवीन सीरीज जारी करण्यात आली आहे. मूळ वर्ष 2016=100 असलेली WRI ची नवीन मालिका मूळ वर्ष 1963-65 च्या जुन्या सीरीजची जागा घेईल. अर्थात आता महागाई भत्ता (DA) मोजण्याची पद्धत (7th Pay Commission) बदलणार आहे. असं कामगार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, चलनवाढीच्या आकडेवारीच्या आधारे, सरकार वेळोवेळी प्रमुख आर्थिक निर्देशकांसाठी आधारभूत वर्ष सुधारित करते. अर्थव्यवस्थेत होत असलेल्या बदलांच्या सहाय्याने हे केले जातेय आणि कर्मचाऱ्यांच्या पगार पद्धतीचा समावेश केला जातो. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO), राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या शिफारशींनुसार, वेतन दर निर्देशांकाचे मूळ वर्ष 1963-65 ते 2016 पर्यंत बदलून त्याची व्याप्ती वाढवून निर्देशांक अधिक कार्यक्षम तयार करण्यात आला आहे.

 

असा मोजला जाईल DA ?
जानेवारी आणि जुलैमध्ये दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता बदलला जातो.
सध्याच्या महागाई भत्त्याच्या दराला मूळ पगाराशी गुणाकार करुन, महागाई भत्त्याची रक्कम ठरवली जातेय.

 

महागाई भत्ता (DA) नेमकं काय आहे ?
हा एक असा पैसा म्हणजे जो सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या राहणीमानाचा खर्च सुधारण्यासाठी दिला जातोय.
वाढत्या महागाईनंतर देखील कर्मचाऱ्यांच्या जीवनमानावर परिणाम होऊ नये, म्हणून हे पैसे कर्मचाऱ्यांना दिले जात आहेत.
तसेच, हा पैसा सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जातोय.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission big change in da calculation find out how much your salary will be now

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा