7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी, मोदी सरकारने बदलले नॉमिनी संबंधीचे नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्र सरकारने कर्तव्यावर असताना मृत होणार्‍या कर्मचार्‍याच्या संबंधीच्या नियमात मोठा बदल केला आहे. हा बदल मृत कर्मचार्‍याच्या कुटुंबियांसाठी खुप महत्वाचा आहे. नव्या नियमानुसार (7th Pay Commission) कर्तव्यावर कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यानंतर मिळणार्‍या भरपाई (compensation) चे पैसे कुटुंबाच्या त्या सदस्याला दिले जातील, ज्यांना नॉमिनी (nominee) केले आहे. म्हणजे जे नॉमिनी आहेत त्यांनाच भरपाई मिळवण्याचा अधिकार (right to compensation) आहे. आतापर्यंत या बाबतीत नॉमिनी बनवण्याचे बंधन नव्हते (major changes in the rules relating to employees who die while on duty).

नॉमिनी बनवला नसेल तर काय होणार :
जर केंद्रीय कर्मचार्‍याने कुणालाही नॉमिनी बनवले नसेल तर भरपाईची रक्कम कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये समान वाटप केली जाईल. म्हणजे या भरपाईवर कुणा एकाच सदस्याचा अधिकार असणार नाही.

सरकारी कर्मचारी पेन्शन, पीएफ किंवा ग्रॅच्युएटीमध्ये नॉमिनी बनवतात.
मात्र, कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास जी भरपाई मिळते, तिच्यासाठी नॉमिनी बनवले जात नाही.
आता सरकारने सक्युर्लर जारी करून याबाबत मार्गदर्शक तत्वे (guidelines) दिली आहेत.

भरपाईसंबंधी कर्मचारी नॉमिनी बनवू शकतात. याद्वारे ठरू शकते की,
जर कर्मचार्‍याचा कामावर असताना मृत्यू झाला तर भरपाईची रक्कम कुटुंबातील कोणत्या सदस्यांना दिली जावी.

सक्युर्लर (circular) मध्ये हे सुद्धा म्हटले आहे की, याबाबतीत केवळ कुटुंबातील सदस्यांनाच नॉमिनी बनवले जाईल.
भरपाईच्या रक्कमेसाठी बाहेरील व्यक्तीला नॉमिनी बनवता येणार नाही.
तसेच सरकारने भरपाईच्या बाबतीत नामांकन दाखल करण्यासाठी सीसीएस (पेन्शन) नियम,
1972 सह संलग्न फॉर्मच्या फॉर्मेटमध्ये सुद्धा सुधारणा केली आहे. (7th Pay Commission)

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission big change in payment of ex gratia lump sum compensation rule announced

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Navratri Mahotsav | गांधी जयंती व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त पुणे नवरात्रौ महोत्सवकडून आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारक भास्कर कर्णिक यांच्या स्मारकभोवती सफाई

MAHATRANSCO Recruitment 2021 | 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र विद्युत मंडळ येथे भरती; जाणून घ्या

Aaditya Thackeray | खड्ड्यांवरुन टीका करणाऱ्या अमित ठाकरेंना मंत्री आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…