7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! जुलैमध्ये पुन्हा महागाई भत्त्यात वाढ (DA) होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Employees) एक महत्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता म्हणजेच डिएमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात (7th Pay Commission) आला आहे. जुलै 2022 मध्ये DA वाढण्याची शक्यता आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या AICPI निर्देशांकात घट झाल्यानंतर आता मार्च महिन्यात त्यामध्ये मोठी झेप घेतली आहे. हा आकडा जाहीर झाल्यानंतर महागाई भत्त्यात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे.

 

जानेवारी 2022 मध्ये AICPI निर्देशांकाचा आकडा 125.1 वर होता. फेब्रुवारी महिन्यात त्यामध्ये आणखी घसरण होऊन ती 125 वर आली. या आधारावर, मार्चमध्ये देखील त्यामध्ये घट अपेक्षित होती, मात्र, 1 पॉइंटची झेप होती आणि ती 126 पर्यंत वाढली आहे. दरम्यान, जुलै 2022 साली (Next DA Hike) DA 3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. परंतु, एप्रिल, मे आणि जूनचे आकडे समोर आल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. आगामी काही महिन्यांतही हाच ट्रेंड कायम राहिला तर महागाई भत्त्याचा (DA) आकडा 4 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. (7th Pay Commission)

आगामी महागाई भत्त्यात (DA Hike) जुलैमध्ये बदल केला जाणार आहे. त्याचा आधार जानेवारी ते जून या कालावधीतील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक असणार आहे. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये घसरण झाली होती, पण मार्चमध्ये उसळी आली आहे. जानेवारीत AICPI 125.1 हा फेब्रुवारीत 125 अंकांवर होता. आता मार्चमध्ये तो 126 अंकांवर पोहोचला आहे. त्यानंतर जुलैमध्ये DA वाढण्याची शक्यता वाढली असल्याचं सांगितलं जात आहे.

 

दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवला जातो.
पहिल्यांदा डीए जानेवारीमध्ये आणि दुसऱ्यांदा जुलैमध्ये वाढतो.
जानेवारी 2022 मध्ये, मार्चमध्ये महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे.
ती तीन महिन्यांच्या थकबाकीसह देण्याची घोषणा देखील सरकारकडून करण्यात आली आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission central employees will get more money da will increase again in july

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा