7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी गुड न्यूज ! DA सोबत मिळेल TA चा फायदा, पे-ग्रेडच्या हिशेबाने होईल पेमेंट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Government Employees) महागाई भत्त्याची Dearness allowance (DA) भेट मिळाली आहे. परंतु, त्यांच्या पगारात केवळ महागाई भत्ता (DA) दिला जात नाही. पगारामध्ये इतर भत्ते देखील समाविष्ट आहेत. त्यापैकी एक प्रवास भत्ता आहे (7th Pay Commission). सरकारी कर्मचार्‍यांना त्यांच्या प्रवासासाठी भत्ता Travelling Allowance (TA) दिला जातो. हा पगाराचा भाग आहे आणि त्यात सतत सुधारणा होत असते. डीएमध्ये वाढ (DA Hike) झाल्याचा परिणाम टीएवरही (TA Hike) दिसून येत आहे. अलीकडेच महागाई भत्त्यात 3% ने वाढ करण्यात आली आहे.

 

कसे होते TA चे कॅलक्युलेशन ?
प्रवास भत्ता वेतन मॅट्रिक्स स्तराच्या आधारावर 3 श्रेणींमध्ये विभागला जातो.
शहरे आणि गावे दोन विभागांमध्ये विभागली गेली आहेत. शहरांच्या लोकसंख्येच्या आधारे हे वर्गीकरण करण्यात आले आहे.

पहिली श्रेणी – उच्च वाहतूक भत्ता शहराचा आहे आणि इतर शहरांना इतरांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
कॅलक्युलेशन फॉर्म्युला Total Transport Allowance = TA + [(TA x DA%) V100] आहे.

 

कोणाला किती प्रवास भत्ता ?
महागाई भत्ता 34 टक्के असल्यास प्रवास भत्ता वाढू शकतो. मात्र, अद्यापपर्यंत सरकारने याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. (7th Pay Commission)

TPTA शहरांमध्ये, लेव्हल 1 – 2 साठी TPTA 1350 रुपये, लेव्हल 3 – 8 कर्मचार्‍यांसाठी 3600 रुपये आणि लेव्हल 9 साठी 7200 रुपये आहे.
कोणत्याही एका श्रेणीतील कर्मचार्‍यांना मिळणार्‍या वाहतूक भत्त्याचा दर सारखाच आहे.
फक्त त्यांना मिळणारा डीए त्यात जोडला जातो.

’हायर ट्रान्सपोर्ट अलाऊन्स’ असलेल्या शहरांसाठी
लेव्हल 9 आणि त्यावरील कर्मचार्‍यांना वाहतूक भत्ता आणि 7,200 रुपये डीए मिळतात. इतर शहरांसाठी हा भत्ता 3,600 रुपये आणि डीए आहे.
त्याचप्रमाणे, लेव्हल 5, 3 ते 8 मधील कर्मचार्‍यांना 3,600 अधिक DA आणि 1,800 अधिक DA मिळतो.

लेव्हल 1 आणि 2 बद्दल बोलायचे तर, या श्रेणीसाठी, प्रथम श्रेणीतील शहरांसाठी 1,350 रुपये जास्त महागाई भत्ता मिळत आहे,
तर इतर शहरांसाठी 900 रुपये जास्त DA उपलब्ध आहे.

 

कोणती 19 शहरे पहिल्या श्रेणीत येतात ?
केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणार्‍या प्रवास भत्त्याच्या (Travel allowance) बाबतीत 19 शहरांना अ श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे.

यामध्ये दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, कोईम्बतूर, गाझियाबाद, बृहन्मुंबई, हैद्राबाद, इंदूर, जयपूर, कानपूर, कोची, कोलकाता, कोझिकोड, लखनौ, नागपूर, पाटणा, पुणे आणि सुरत या शहरांचा समावेश आहे.
उर्वरित शहरांना इतरांच्या श्रेणीत टाकण्यात आले आहे.

 

कार फॅसिलिटीवाल्यांना किती मिळतो TA ?
ज्या कर्मचार्‍यांना कारची सुविधा मिळाली आहे, त्यांना दरमहा 15,750 रुपये + डीए दिला जातो.
सॅलरी लेव्हल 14 आणि त्यावरील वेतन श्रेणी असलेल्या कर्मचार्‍यांना कार सुविधा उपलब्ध आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission central government employees travel allowance after da hike details inside with dearness allowance latest update

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा