7th Pay Commission | नवीन वर्षात मोदी सरकार इतका वाढवणार DA, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार मोठी वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | नवीन वर्ष येण्यास अजून २० दिवस उरले असून येत्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक चांगल्या बातम्या मिळू शकतात. नवीन वर्ष २०२३ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे (7th Pay Commission DA hike).

 

मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत आलेल्या AICPI इंडेक्सच्या डेटानुसार, सरकार पुढील वर्षी मार्चपर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ ते ५ टक्क्यांनी वाढ करू शकते. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. डीए कमाल ५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३८ टक्के DA मिळतो. जर सरकारने पुढील वर्षी २०२३ मध्ये ३ ते ५ टक्के महागाई भत्ता वाढवला तर डीए (Dearness Allowance) ४१ ते ४३ टक्केच्या दरम्यान होईल. (7th Pay Commission)

 

या एका उदाहरणाच्या माध्यमातून पगार किती वाढेल हे जाणून घेऊया. समजा एखाद्याचा पगार ५०,००० रुपये असेल आणि त्याचा मूळ पगार २०,००० रुपये असेल, तर त्याला ३८ टक्के दराने सध्या ७,६०० रू. डीए मिळत असेल. जर डीए ५ टक्क्यांनी वाढला तर पगारातील डीएचा भाग ८,६०० रुपये होईल. म्हणजेच पगारात १,००० रुपयांची वाढ आणि वार्षिक १२,००० रुपयांची वाढ होणार आहे.

या आधारावर ठरतो महागाई भत्ता
कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता AICPI इंडेक्सच्या डेटावर अवलंबून असतो.
जर या इंडेक्सचा डेटा वाढला तर त्याच प्रमाणात डीए देखील वाढतो. सप्टेंबर २०२२ मध्ये, AICPI चा आकडा १३१.३ होता,
ज्यात ऑक्टोबरमध्ये १.२ अंकांनी वाढ झाली आणि १३२.५ वर पोहोचला. त्यानंतर सरकारने दिवाळीपूर्वी डीएमध्ये ४ टक्के वाढ केली होती.

 

वर्षात २ वेळा वाढतो महागाई भत्ता
सरकार जानेवारी आणि जुलै असा वर्षभरात २ वेळा महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) वाढवते.
या वर्षाच्या सुरुवातीला मार्चमध्ये सरकारने डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ केली होती.
त्यानंतर दिवाळीपूर्वी डीएमध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली होती.
दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. २००६ मध्ये,
केंद्र सरकारने केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी DA आणि DR चा कॅलक्युलेशन फॉर्म्युला रिवाईज केला होता.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission central government employees will get 5 percent da hike employees will get bumper salary pm narendra modi government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune NCP | चंद्रकांत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्याची ओळख पटली

Devendra Fadnavis | चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीनंतर देवेंद्र फडणवीस संतापले, म्हणाले… (व्हिडिओ)