7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांचा किमान मूळ पगार वाढून होणार 26000! वेतन वाढवण्याबाबत आली नवी माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | पगार वाढवून मोदी सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांना (central government employees) भेट देऊ शकते का? सरकार कर्मचार्‍यांच्या मूळ पगारात वाढ करू शकते, अशा बातम्या अनेक दिवसांपासून येत आहेत. मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवल्यास, मोदी सरकार (modi government) फिटमेंट फॅक्टर (fitment factor) वाढवण्याचाही विचार करत आहे. फिटमेंट फॅक्टर सर्व केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांचे मूळ वेतन ठरवते. (7th Pay Commission)

 

मोदी सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवल्यास कर्मचार्‍यांचे किमान मूळ वेतन म्हणजेच मूळ वेतन 18000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढू शकते. मीडिया रिपोर्टनुसार, कर्मचारी संघटना याप्रकरणी सरकारच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर किमान पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

 

26 हजार रुपये होईल मूळ वेतन
केंद्र सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांचे वेतन आपोआप वाढेल. फिटमेंट फॅक्टर सर्व केंद्रीय सरकारी कर्मर्‍यांचे मूळ वेतन ठरवतो.

 

फिटमेंट फॅक्टर शेवटचा 2016 मध्ये वाढवण्यात आला होता, ज्यामध्ये कर्मचार्‍यांचे किमान मूळ वेतन 6,000 रुपयांवरून 18,000 रुपये करण्यात आले होते.
फिटमेंट फॅक्टरमध्ये संभाव्य वाढीमुळे 26,000 रुपये किमान मूळ वेतन मिळू शकते. सध्या किमान मूळ वेतन 18,000 रुपये असून ते 26,000 रुपये होणार आहे.

भत्ते वाढतील
मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढल्यास, महागाई भत्ताही वाढेल.
महागाई भत्ता (DA) मूळ वेतनाच्या 31 टक्के इतका आहे. DA ची गणना डीएच्या दराला मूळ वेतनाने गुणाकार करून केली जाते.
म्हणजेच मूळ वेतनात वाढ झाल्यास महागाई भत्ता आपोआप वाढतो.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission central government employees will get salary hike 26 thousand in minimum basic salary

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shilpa Shetty Viral Kiss Video | भर कार्यक्रमामध्ये शिल्पा शेट्टीला केलं होतं KISS, ज्यामुळे तिला तब्बल 15 वर्ष न्यायालयानं ठेवलं जखडून; पाहा व्हायरल व्हिडिओ

 

Samantha-Allu Arjun | समंथाच्या घटस्फोटानंतर अल्लू अर्जुननं बदललं तिचं नशीब, तिच्यासाठी अल्लू अर्जुन ठरला लकी…

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना ‘या’ आठवड्यात मिळू शकते चांगली बातमी, 18 महिन्याच्या थकीत डीए एरियरवर होणार निर्णय