7th Pay Commission | मोदी सरकारकडून सरकारी कर्मचार्‍यांना मोठी भेट ! मुलांना मिळणार 1.25 लाखांपर्यंत पेन्शन; जाणून घ्या नवे नियम

नवी दिल्ली वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employees) कुटुंबाला पेन्शनची (7th Pay Commission) सुविधा मिळणार आहे. कुटुंबात पती – पत्नी दोघेही सरकारी कर्मचारी असतील, तर अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाला देखील कुटुंब निवृत्ती वेतनाचा (Family Pension) हक्क मिळणार आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) ही एक केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवी भेट असणार आहे.

 

केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती वेतन (Central Civil Service Retirement Pay) 1972 अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. निवृत्तीनंतर 2 कर्मचारी मरण पावले, तर अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबातील मुलांना (नामनिर्देशित) पेन्शन मिळणार आहे. ही पेन्शन 1.25 लाख रुपयांपर्यंत असू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना एक दिलासा मिळाला आहे. (7th Pay Commission)

 

पेन्शनचा लाभ घेण्यासाठी अटी काय ?
CCS पेन्शन 1972 च्या नियम 54 (11) नुसार, जर पती – पत्नी दोघेही केंद्रीय सरकारी कर्मचारी असतील आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दुसऱ्या व्यक्तीला त्याचे कौटुंबिक पेन्शन मिळणार आहे.
त्याचबरोबर दुसरं म्हणजे, निवृत्तीनंतर दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झाल्यास,
अशा परिस्थितीत त्यांच्या मुलाला कुटुंब निवृत्ती वेतनाची सुविधा मिळणार आहे.

दरम्यान, याआधी एखाद्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना पेन्शनची सुविधा मिळायची.
मात्र, ते केवळ 45 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध होते. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची कमाल मर्यादा 2.5 लाख आहे.
पण, जर पती – पत्नी दोघांचा मृत्यू झाला,
तर अशा परिस्थितीत एका पेन्शनच्या 50 टक्के अर्थात 1.25 लाख आणि इतर 30 टक्के अर्थात 75 हजार रुपये दिले जातील.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission central government pension rule ccs family pension rule upto 1 25 lakhs

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा