Homeताज्या बातम्या7th Pay commission | दिवाळीपूर्वी येणार महागाई भत्त्याचा एरियर, समजून घ्या ऑक्टोबरच्या...

7th Pay commission | दिवाळीपूर्वी येणार महागाई भत्त्याचा एरियर, समजून घ्या ऑक्टोबरच्या वाढीव पगाराचे गणित

नवी दिल्ली :  वृत्त संस्था  – 7 th Pay commission | केंद्र सरकार दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचार्‍यांना (central government employees) आणखी एक भेट देणार आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांना ऑक्टोबर 2021 च्या वेतनात महागाई भत्त्याचा एरियर (DA Arrear) सुद्धा मिळेल. नुकताच मोदी सरकारने महागाई भत्ता (Dearness allowance) 3 टक्केच्या वाढीसह 31 टक्के केला आहे. अर्थ मंत्रालयाने वाढलेला डीए (DA Hike) 1 जुलै 2021 पासून लागू सुद्धा केला आहे. स्पष्ट आहे की ऑक्टोबरमध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांना एकुण 4 महिन्याचा डीए एरियर (7th Pay commission) सुद्धा मिळेल. यामुळे त्यांना या महिन्यात वाढीव पगार (Salary Hike) मिळेल.

वाढलेल्या DA चे कॅलक्युलेशन

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 3 टक्के महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) वाढ मंजूर करण्यात आली. या निर्णयाचा फायदा केंद्रातील 47.14 लाख कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. हा नवीन महागाई भत्ता जुलै 2021 पासून लागू होईल.

बेसिक सॅलरी 56,900 रुपयांवर डीए

मूळ वेतन 56900 रुपये असल्यास नवीन 31 टक्के महागाई भत्त्यानुसार भत्ता 17639 रुपये प्रति महिना असेल. महागाई भत्त्यात एकुण वाढ 1707 रुपये होईल. ही वाढ वार्षिक मोजली असता 20484 रुपये होईल. तर आधीच्या 28 टक्के महागाई भत्त्याच्या हिशोबाने 15932 रुपये प्रति महिना डीए मिळाला (7th Pay commission) असता.

– या आधारावर सॅलरीत एकुण 20,484 रुपये वार्षिक वाढ होईल. ऑक्टोबरमध्ये जर 3 महिन्याचा एरियर मिळाला तर 52,917 रुपये सुद्धा येतील. ऑक्टोबर महिन्याचा एरियर सोबत मिळाल्यास 4 महिन्याचे 70,556 रुपये येतील.

बेसिक सॅलेरी 18,000 रुपयांवर डीए

जर बेसिक सॅलरी 18,000 रुपये असेल तर 28 टक्केच्या दराने आता 5,030 रुपये महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये 3 टक्केची वाढ झाली आहे.
आता 31 टक्केच्या दराने डीए मिळेल.

आता 31 टक्केच्या हिशेबाने डीएचे 5,580 रुपये मिळतील म्हणजे कर्मचार्‍याचे
वेतन 18,000 रुपये बेसिक असल्यास 540 रुपयांची वाढ डीएमध्ये होईल.
आता तीन महिन्याचा डीए एरियर म्हणून पगारात 1,620 रुपये जादा येतील.

दुसर्‍यांदा वाढवला महागाई भत्ता

यापूर्वी महागाई भत्ता 1 जुलै 2021 पासून सरकारने 28 टक्क्यांनी वाढवला होता. तत्पूर्वी तो 17 टक्क्यांपेक्षा 11 टक्क्यांनी जास्त होता.
परंतु 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीसाठी डीए फक्त 17 टक्के ठेवण्यात आला होता.
नव्या दरवाढीमुळे आता आता डीए 28 टक्क्यांवरून (DA Hike) वाढून 31 टक्के झाला (7th Pay commission) आहे .

Web Title :- 7th Pay commission | 7th pay commission da arrear will credit before diwali know calculation of increasing october 2021 salary

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 104 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

former Indonesian President Sukarno | इण्डोनेशियाचे संस्थापक राष्ट्रपती सुकर्णो यांची कन्या इस्लाम सोडून स्वीकारणार हिंदू धर्म,
जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्येचा देश

Petrol Diesel Price Pune | एक दिवसाच्या दिलाशानंतर पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या नवीन दर

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News