आर्थिकताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना मोठा झटका ! 18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | तुम्ही जर केंद्रीय कर्मचारी (Central Government Employee) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मागील 18 महिन्यापासून प्रलंबित असलेल्या डीएबाबत (DA) मोदी सरकारने (Modi Government) मोठा निर्णय (7th Pay Commission) घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मागील 18 महिन्यांचा डीए म्हणजे महागाई भत्ता Dearness Allowance (DA) आता कर्मचाऱ्यांना दिला जाणार नाही.

 

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए म्हणजे महागाई भत्त्यात मार्च महिन्यात वाढ होणार आणि 18 महिन्यापासून थकीत असलेली रक्कम होळीच्या (Holi) सणाला मिळणार अशी माहिती होती. परंतु आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 महिन्यांची डीएची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतची डीएची थकबाकी आहे. सरकारने याबाबतचे निवेदन जारी केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. (7th Pay Commission)

 

थकीत डीएची रक्कम मिळणार नसली तरी होळीच्या दिवशी सरकार डीएमध्ये वाढ करुन कर्मचाऱ्यांना खुशखबर देण्याच्या तयारीत आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के डीए मिळत आहे. मात्र, तो वाढून 34 टक्के होणार आहे.

 

कोरोनामुळे डीएची रक्कम दिली नाही
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एक निवेदन जारी करुन यासंदर्भात माहिती दिली होती. कोरोना महामारीमुळे (Corona Epidemic) केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थांबवला होता. या पैशातून गरीब आणि गरजवंतांना सरकार मदत करु शकेल, या उद्देशाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए दिला नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

 

खासदारांच्या पगारात कपात केली, पण…
कोरोना महामारीमुळे सरकारने मंत्री (Ministers) आणि खासदार (MP) यांच्या पगारात कपात (Salary Deduction) केली होती. मात्र, मागील वर्षभरापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आलेली नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये देखील कपात करण्यात आली नाही.

3% वाढ होणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात तीन टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे 31 टक्के मिळणारा महागाई भत्ता यापुढे 34 होणार आहे. AICPI Index च्या अंदाजानुसार, डिसेंबर 2021 च्या निर्देशांकात एका अंकाची घट झाली आहे. महागाई भत्त्याचा सरासरी निर्देशांक 351.33 एवढा राहिला आहे. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 34.04 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

 

मुळ पगारात होणार वाढ
जर कर्मचाऱ्याचा मुळ पगार (Basic Salary) 18 हजार असेल तर त्याला 34 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.
या हिशोबाने कर्मचाऱ्याच्या पगारात वार्षिक 73 हजार 440 रुपये वाढ होऊ शकते.
त्यानुसार मुळ पगारात वार्षीक 6 हजार 480 रुपयांची वाढ होईल.

 

मार्चमध्ये घोषणा होण्याची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार सध्या देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Assembly Elections) आहेत.
त्यामुळे अचारसंहिता (Code of Conduct) लागली आहे. त्यामुळे सरकार निवडणुकांच्या निकालानंतर
म्हणजे मार्च महिन्यात वाढीव महागाई भत्त्याची घोषणा करेल. आचारसंहितेमुळे सरकार सध्या याबाबतची घोषणा करु शकत नाही.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission da arrears of 18 months modi central government employees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | धक्कादायक ! अनैतिक संबंधाला पोटचा 13 वर्षाचा मुलगा ठरत होता अडथळा, परकरच्या नाडीने आईने आवळला गळा

 

Pune Crime | पुण्यात पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन आत्महत्या करुन अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्याची धमकी

 

Case Against Sameer Wankhede | एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना मोठा झटका ! कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

Back to top button