आर्थिकताज्या बातम्यामुंबई

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! बॅंक खात्यात जमा होणार लाखो रुपये; वेतनात वाढ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Government Employees) एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. 18 महिन्यांपासून महागाई भत्ता (DA) थकबाकीची प्रतीक्षा आता संपू शकते. सरकार 2 लाख रुपयांपर्यंतचा महागाई भत्ता एकत्रितपणे देण्याचा विचार करत आहे. जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतचा थांबलेला महागाई भत्ता DA देण्याची कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीला आता यश येणार असल्याचं (7th Pay Commission) दिसत आहे.

 

अनेक कर्मचारी संघटनांचे नेते थकीत महागाई भत्त्याची वारंवार मागणी करत आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे अर्थ मंत्रालयाने मे 2020 मध्ये 30 जून 2021 पर्यंत महागाई भत्त्यामधील वाढ थांबवली होती. आता त्याबाबत सरकार विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एक दिलासा मिळणार आहे. (7th Pay Commission)

 

लेव्हल 1 कर्मचार्‍यांची महागाई भत्ता थकबाकी रुपये 11 हजार 880 ते 37 हजार रुपये असेल. दुसरीकडे, स्तर 13 कर्मचाऱ्यांना 1 लाख 44 हजार 200 ते 2 लाख 18 हजार 200 रुपये महागाई भत्ता (DA) थकबाकी म्हणून मिळतील. सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील नोकर आणि पेन्शनधारकांना (Pensioners) महागाई भत्ता उपलब्ध आहे.

 

किती वाढणार DA ?

डीए मधील वाढ एआयसीपीआयच्या (AICPI) डेटावर अवलंबून आहे. मार्च 2022 मध्ये एआयसीपीआय निर्देशांकात वाढ झाली होती,
त्यानंतर हे निश्चित आहे की सरकार महागाई भत्ता 3 नव्हे तर 5 टक्के वाढवू शकते.
याला मंजुरी मिळाल्यास कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 39 टक्के होण्याची शक्यता आहे.

 

किती वाढेल वेतन ?

ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56 हजार 900 रुपये आहे, त्यांना 39 टक्के महागाई भत्ता असल्यास 21 हजार 622 रुपये DA मिळणार आहे.
सध्या 34 टक्के दराने 19.346 रुपये मिळत आहेत.
त्यामुळे डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाल्याने वेतनामध्ये 2 हजार 276 रुपयांची वाढ होईल,
याचा अर्थ वर्षाला सुमारे 27 हजार 312 रुपये अधिक वेतन मिळू शकतो.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission da hike update employees to get da upto 2 lakhs in their salary account as 18 months da arear

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button