7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ ? पगारात होणार घसशीत वाढ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकार (Central Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Employees) महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे. जर महागाई भत्त्यात वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात (Salary) मोठी वाढ होऊ (7th Pay Commission) शकते. मात्र ही पगारवाढ किती होणार हे अद्यापर सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowances) 3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. 2022 चा अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करण्यापूर्वी सरकार हा निर्णय घेण्याची तयारी करत आहे. याशिवाय केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात देखील वाढ करण्याची तयारी सरकार करत आहे. (7th Pay Commission)

 

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या 31 टक्के महागाई भत्ता आहे. यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली तर तो 34 टक्के होईल. AICPI नोव्हेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता आता 34 टक्के आहे.

अशी होणार वाढ

कर्मचाऱ्याचा मूळ पगार – 18 हजार प्रति महिना
34 टक्के महागाई भत्ता – 6120 रुपये प्रति महिना
31 टक्के महागाई भत्ता – 5580 रुपये प्रति महिना
महागाई भत्त्यात वाढ – 6120-5580 = 540 रुपये प्रति महिना
वार्षिक पगारात वाढ – 540X12 = 6480 रुपये

 

मूळ वेतनात जास्तीत जास्त वाढ

कर्मचाऱ्याचा मूळ पगार – 59,900 प्रति महिना
34 टक्के महागाई भत्ता – 19,346 रुपये प्रति महिना
31 टक्के महागाई भत्ता – 17,639 रुपये प्रति महिना
महागाई भत्त्यात वाढ – 19,346-17,639 = 1707 रुपये प्रति महिना
वार्षिक पगारात वाढ – 1707X12 = 20,484 रुपये

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission da of central government employees expected to increase in jan feb 2022 by 3 percent

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा